पावसाळ्यात वाहन टेस्ट देणे होणार कठीण, ट्रक जवळ साचतेय पाणी

पावसाळ्यात वाहन टेस्ट देणे होणार कठीण, ट्रक जवळ साचतेय पाणी
Published on
ॲंकर NSK26H22216 जळगाव : थोड्याच पावसात वाहन ट्रॅकजवळ साचलेले पाणी. --- पावसाळ्यात वाहन चाचणी देणे होणार कठीण ‘ट्रॅक’जवळ साचतेय पाणी; सुविधा पुरविण्याची वाहनधारकांची मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : पावसाळा सुरू होताच वाहनचालक परवान्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट देणाऱ्या उमेदवारांसमोर नव्या अडचणी उभ्या राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहन चाचणी प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही ट्रॅकवरील अपुऱ्या सुविधांबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. ट्रॅकच्या काही भागांमध्ये पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठे खड्डे आणि चिखल निर्माण होतो. विशेषतः अवजड वाहनांच्या चाचणी मार्गाजवळ पाणी साचल्यामुळे उमेदवारांना वाहनाचे संतुलन राखणे कठीण जाऊ शकते. पाण्यामुळे रस्त्यावरील खुणा अस्पष्ट होतात आणि चाचणीदरम्यान चुका होण्याची शक्यता वाढते. वाहन परवाना मिळविण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने उमेदवार टेस्टसाठी येतात. मात्र पावसाळ्यात ट्रॅकवरील परिस्थिती बिघडल्यास चाचणी प्रक्रियेला विलंब होऊ शकतो. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही प्रशासनासमोर आव्हान निर्माण होणार आहे. स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी ट्रॅक परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ट्रॅकवरील निचरा व्यवस्था सुधारण्याबरोबरच चाचणी मार्गाची दुरुस्ती करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास वाहन टेस्ट देणाऱ्या उमेदवारांना आगामी दिवसांत मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com