विधान परिषद निवडणुकीचा जल्लोष

विधान परिषद निवडणुकीचा जल्लोष
Published on
टुडे १, मेन बातमीत क्लब करणे ---- NSK26H22226 जळगाव : विधान परिषद निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांच्या विजयानंतर भाजपचा झेंडा घेऊन जल्लोष करताना कार्यकर्ते. ---- विजय महायुतीचा, जल्लोष भाजपचा! उपशीर्षक महाजन भाजपचे सहावे आमदार; मंगेश चव्हाण मताधिक्याचे शिल्पकार सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : साधारणपणे पाचशेवर मतांची अपेक्षा असताना तब्बल ५८२ मतांची थैली घेऊन विजयी झालेले भाजप- महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी या ऐतिहासिक निकालानंतर मोठा जल्लोष केला. महाजन महायुतीचे उमेदवार असताना विजयी जल्लोषात शिवसेनेचा एकही पदाधिकारी अथवा कार्यकर्ता सहभागी झाल्याचे दिसले नाही. या विजयानंतर नंदकिशोर महाजन हे भाजपचे जिल्ह्यातील सहावे आमदार ठरले आहेत. महाजनांना महायुतीची व अन्य अशी पाचशे मते अपेक्षित असताना त्यांचे मताधिक्य ५८२ पर्यंत पोहोचविण्यामागे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची रणनीती कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. भाजपचा विजयी जल्लोष जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करण्यासाठी महाजनांना जळगाव जिल्ह्यातील पालिका सदस्य असलेल्या मतदारांनी भरभरून मते दिली. विजयाची अधिकृत घोषणा होताच कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणासह प्रवेशद्वारावर एकच जल्लोष केला. गुलालाची उधळ, फटाक्यांची आतषबाजी करत आनंद व्यक्त केला. महाजनांना पेढाही भरविण्यात आला. महाजन, मंगेश चव्हाण यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत नृत्य केले. त्यानंतर नंदू महाजनांसह, खासदार स्मिता वाघ, आमदार चव्हाण, सुरेश भोळे (राजूमामा), अमोल जावळे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्‍याम चौधरी, चंद्रकांत बाविस्कर, दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, गटनेते प्रकाश बालाणी यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाच्या जी. एम. फाउंडेशन स्थित कार्यालयाजवळ आले. त्याठिकाणीही मोठा जल्लोष करण्यात आला. --------- चौकट आम्ही युतीधर्म पाळला, भाजपने नाही : भंगाळे महाजनांच्या विजयी जल्लोषात शिवसेनेचा एकही पदाधिकारी, नेता वा कार्यकर्ता दिसला नाही. यासंदर्भात जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी नाशिकला शिवसेना उमेदवारासोबत दगाफटका झाल्याचा दावा केला. आम्ही जळगावात युतीधर्म प्रामाणिकपणे पाळला, मात्र भाजपने नाशिकमध्ये दगाफटका केल्याने आमचे उमेदवार नरेंद्र दराडे पराभूत झाले, असा आरोप भंगाळे यांनी केला. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com