मतमोजणीपूर्वी आक्षेप अन्‌ वाद

मतमोजणीपूर्वी आक्षेप अन्‌ वाद
Published on
२२१९३, २२९१४ मतमोजणीपूर्वीच आक्षेप अन्‌ वाद! प्रशासनाची मध्यस्थी; समर्थकांमध्ये बाचाबाची सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : विधान परिषद निवडणुकीत सोमवारी (ता. २२) पार पडलेल्या मतमोजणीप्रसंगी अपक्ष गोकुळ गिते यांनी शिवसेना-महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा दारुण पराभव केला. पण या वेळी गिते आणि दराडे समर्थकांमधील बाचाबाची चर्चेचा विषय ठरली. जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सकाळी आठला प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला. पण तत्पूर्वी सकाळी सातच्या सुमारास गिते व दराडे हे त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधींसमवेत मतमोजणी केंद्रावर पोहोचले. या वेळी दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी विजयाचा दावा केल्याने काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला; परंतु पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करून हा वाद मिटविला. मात्र, त्यानंतरही मतमोजणी केंद्रात या वादाचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी त्यांचे बंधू आमदार किशोर दराडे यांना मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नेमले. याच मुद्द्यावरून अपक्ष गिते यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी सुनावणी घेतली. या वेळी गिते यांच्या वकिलांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार देत ही नियुक्ती योग्य नसल्याची बाजू मांडली, तर दराडेंच्या वकिलांनी विधान परिषद निवडणुकीप्रसंगी आमदार किंवा नगरसेवकांना मतमोजणी प्रतिनिधी म्हणून नेमणूक करता येणे शक्य असल्याचा युक्तिवाद केला. या युक्तिवादावर प्रशासनाने तपासला असता दराडेंच्या बाजूचा युक्तिवाद योग्य असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद यांनी गितेंचा दावा फेटाळून लावला. प्रतिनिधीवरून आक्षेप मतमोजणी केंद्रामध्ये गोकुळ गिते यांचे पोलिंग एजंट मतमोजणी प्रतिनिधींसमवेत जाऊन बसले. त्यावर नरेंद्र दराडे यांनी आक्षेप घेत त्यांना जागेवरून दूर नेण्याची मागणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने पोलिंग एजंटला बाहेरचा रस्ता दाखविला. यादरम्यान मतमोजणी केंद्रात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. उमेदवारांना मिळालेली मते उमेदवार..........टेबल १..........टेबल २..........टेबल ३..........टेबल ४..........एकूण गोकुळ गिते.......... ८०..........९३.......... १००.......... ८४..........३५७ नरेंद्र दराडे.......... ८५..........५२.......... ४८.......... ६३..........२४८ प्रसाद हिरे..........००..........००..........००..........००..........००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com