योग दिन

योग दिन
Published on
धुळे : टुडे पान ३ साठी..मेन -- फोटो क्रमांक : 22233 धुळे : नवजीवन इंग्लिश स्कूल येथे योग दिन निमित्त झालेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना हर्षकुमार रेलन. शेजारी डॉ. संजय संघवी, अमोल मासुळे, प्रदीप बैरागी, अविनाश घूंडियाल, वैशाली पाटील, उर्मिला पाटील आदी. -- फोटो क्रमांक : 22234 धुळे : जिजामाता कन्या विद्यालय येथे योगासने करताना विद्यार्थिनी. -- योगातून निरोगी जीवनाचा दिला संदेश -- धुळ्यात शाळा, महाविद्यालयांमध्ये सामूहिक प्रात्यक्षिके; आरोग्याचा संदेश सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : उत्साहाचे वातावरण, पहाटेची प्रसन्न वेळ आणि योगासनांच्या विविध मुद्रांनी सजलेले प्रांगण अशा प्रेरणादायी वातावरणात धुळे शहर व परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी आणि नागरिकांनी एकत्र येत सामूहिक योगाभ्यास केला. योगाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली अंगीकारणे, शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राखणे आणि सशक्त समाज निर्मितीसाठी योगदान देणे असा संदेश या सर्व उपक्रमांमधून देण्यात आला. - नवजीवन इंग्लिश स्कूल साक्री रोडवरील नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भाजप पश्चिम मंडल व शाळेच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. कार्यक्रमास सिद्धेश्वर हॉस्पिटलचे डॉ. संजय संघवी, संस्था अध्यक्ष हर्षकुमार रेलन, भाजप पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल मासुळे, नगरसेवक प्रदीप बैरागी, सीए अविनाश घूंडियाल, योगशिक्षिका वैशाली पाटील व उर्मिला पाटील उपस्थित होते. संस्था अध्यक्ष रेलन यांनी योगाचे महत्त्व विशद करताना सांगितले, की योग ही भारताच्या ऋषी- मुनींनी मानवजातीला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी असून ते शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा जोडणारे विज्ञान आहे. आजची पिढी मोबाईल, इंटरनेट आणि स्पर्धेच्या जगात वाढत असल्याने मानसिक ताण व आरोग्याच्या समस्या वाढतात. अशा परिस्थितीत योग विद्यार्थ्यांना मानसिक स्थैर्य, एकाग्रता, आत्मविश्वास आणि शिस्त प्रदान करतो. अभ्यासात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज किमान दहा मिनिटे योगाभ्यास केला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे १७७ देशांनी पाठिंबा देत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून मान्य केला ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर योगशिक्षिका उर्मिला पाटील आणि वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी उत्साहाने योगासने आणि प्राणायामाचा सराव केला. - जयहिंद हायस्कूल येथील जयहिंद शिक्षण संस्थेच्या जयहिंद हायस्कूलमध्ये जागतिक योगदिनी विशेष मार्गदर्शनपर योगाशिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीर विद्यालयाचे प्राचार्य डी. व्ही. निकम यांच्या मार्गदर्शनात व उपमुख्याध्यापिका मीना पिंपळीसकर, पर्यवेक्षिका वत्सला ठिंगळे, अनिता पाटील, संजिता पाटील यांनी आयोजित केले. योगशिक्षिका मीनाक्षी पटेल यांनी मार्गदर्शन करत नियम, ध्यानधारणा, प्राणायाम व सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिक घेतले व त्याचे महत्त्व सांगितले. उपमुख्याध्यापिका पिंपळीसकर यांनी आभार मानले. पर्यवेक्षिका एस्. यू. पाटील यांनी प्रास्ताविक केले. विद्यालयातील दोन हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. क्रीडाशिक्षक योगेश चव्हाण, प्रितम साळुंखे, दिलीप वाघ, अशोक अहिरे, रवींद्र भदाणे, योगेश शिंदे, विकी वाडेकर आदींनी संयोजन केले. - पिंपळादेवी माध्यमिक विद्यालय मोहाडी उपनगरातील पिंपळादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक एस. एस. पाटील अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी योग विद्याधामचे नामदेव देवरे, पूजा केदार व निवृत्त क्रीडाशिक्षक आर. बी. शिंदे यांनी सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांसमवेत योग प्रात्यक्षिके सादर केली. त्यांनी प्राणायाम, विविध योगासने व ओंकार आदी क्रिया करून घेतल्या. मुख्याध्यापक पाटील यांनी विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व व योगाचे फायदे या विषयी मार्गदर्शन केले. व्ही. बी. कापडणीस यांनी सूत्रसंचलन केले. उपमुख्याध्यापक आर. एस. शिंदे, पर्यवेक्षक ए. आर. पाटील, एस. एन. सोनवणे यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. - पाटील महाविद्यालय जयहिंद शैक्षणिक संस्था संचलित झेड. बी. पाटील महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता निर्धारण समिती व शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. याप्रसंगी योग विद्याधामच्या योगप्रशिक्षिका प्रा. राजश्री शेलकर व रवींद्र शेलकर यांनी शंखाच्या नाद ध्वनीने योग प्रशिक्षणाला सुरुवात केली. त्यांनी उपस्थितांना विविध योग आसने आणि प्राणायाम करून घेतले. प्रभारी प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, उपप्राचार्य डॉ. डी. के. पाटील, डॉ. वर्षा पाटील उपस्थित होते. एन.सी.सी. व एन.एस.एस. चे विद्यार्थी, खेळाडू व प्राध्यापक मिळून ८० साधक उपस्थित होते आणि त्यांनी नियमित योगाचा संकल्प केला. प्रा. भाग्यश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नितीन वाळके यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी डॉ. सुर्यकांत गायकवाड, रोहित सोनावणे, अविनाश वाघ, अशोक बागुल, भालेराव पाटील, आबासाहेब नेरकर यांनी परिश्रम घेतले. - जिजामाता कन्या विद्यालय एसएसव्हीपीएस संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राचार्य अपर्णा विजय पाटील यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. योग शिक्षिका मनिषा कमलेश पाटील यांनी विद्यार्थिनींना सूर्यनमस्कार, वृक्षासन, ताडासन, अनुलोम-विलोम प्राणायाम यांसारख्या योगप्रकारांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले आणि प्रात्यक्षिके करून दाखवली. प्राचार्य पाटील यांनी विद्यार्थिनींना योगाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचा संदेश दिला. मुकेश येथेकर, सयाजी भामरे, संजय देवरे, अभिजीत पाटील व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी संयोजन केले. चंद्रकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. - श्रवण विकास विद्यालय बधीर पुनर्वसन संस्थे संचलित प्रा. रघुनाथ केले वाक श्रवण विकास विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. विशेष गरजा असणाऱ्या श्रवणविकलांग विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक नरेश वळवी आणि विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष योगासने व प्राणायाम करून उत्तम आरोग्याचा संकल्प केला. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीमध्ये योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. - नूतन मराठा विद्यालय छडवेल कोर्डे (ता. साक्री) येथील नूतन मराठा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. साक्री तालुका एजुकेशन संस्थेचे विश्वस्त उत्तमराव बोरसे, विद्यालयाचे प्राचार्य, पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. शिक्षक राजन पवार यांनी उपस्थितांना योगासनांचे मानवी जीवनातील आणि आरोग्यातील महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विविध प्रकारची योगासने व प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांकडून ती शास्त्रोक्त पद्धतीने करून घेतली. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त बोरसे यांनी स्वतः काही उपयुक्त योगासनांचे सादरीकरण करून उपस्थितांना प्रेरित केले. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com