धुळे : टुडे पान ३ साठी.. शिल्लक बातमी
--
फोटो क्रमांक : 22170
धुळे : बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा महासचिव पदाचे नियुक्तीपात्र प्रा. प्रवीण सूर्यवंशी यांना देताना राज चव्हाण. शेजारी भैय्यासाहेब पारेराव, रवींद्र इंगळे आदी.
--
बसपा जिल्हाध्यक्षपदी
भैय्यासाहेब पारेराव
--
जिल्हा कार्यकारिणी जाहीर ; प्रा. सूर्यवंशी महासचिव
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. पक्षाच्या मुख्य कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे, खासदार रामजी गौतम आणि पुणे व खानदेश झोनचे प्रभारी राज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. या नवीन कार्यकारिणीत जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी भैय्यासाहेब पारेराव यांच्यावर तर जिल्हा महासचिव पदाची जबाबदारी प्रा. प्रवीण सूर्यवंशी यांच्यावर सोपवण्यात आली. तसेच धुळे लोकसभा प्रभारी म्हणून योगेश जगताप आणि राजदीप आगळे यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी देवेंद्र पाटील, कोषाध्यक्षपदी निहाल अहमद अमीर खाटीक, जिल्हा सचिवपदी विजय भामरे, जिल्हा कार्यकारी सचिवपदी मिलिंद वाघ यांची निवड करण्यात आली. बी.व्ही.एफ.साठी उमेद कढरे व सुनील मोरे, तर जिल्हा कार्यकारी सदस्य म्हणून रवींद्र इंगळे, दिनेश फारसे आणि निलेश वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रसंगी राज चव्हाण यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आले.