प्रयागम संस्था

प्रयागम संस्था
Published on
धुळे : टुडे पान ३ साठी.. शिल्लक बातमी -- फोटो क्रमांक : 22135 धुळे : सिस्टेल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रियंका गोराणे. उपस्थित शिक्षक. -- विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपा! -- प्रयागम संस्थेतर्फे शिक्षकांसाठी विशेष मार्गदर्शन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : प्रयागम बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘दत्तक शाळा समुपदेशन उपक्रमा’तर्गत येथील सिस्टेल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षकांसाठी व्याख्यान झाले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे मानसिक व भावनिक विश्व आणि वर्तन समस्या या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये मानसिक आरोग्याचे महत्त्व लक्षात घेऊन झालेल्या या उपक्रमाला शिक्षकांनी प्रतिसाद दिला. समुपदेशक डॉ. प्रियंका संदीप गोराणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेली मानसिक अस्वस्थता, भावनिक ताणतणाव, वर्तनातील बदल, अभ्यासाचा दबाव, सोशल मीडियाचा प्रभाव आणि आत्मविश्वासाची कमतरता याविषयी मार्गदर्शन केले. मुलांच्या वर्तनातील सूक्ष्म बदल ओळखून शिक्षकांनी त्यांना योग्य वेळी भावनिक आधार व समुपदेशन कसे द्यावे, याबाबत त्यांनी सूचना दिल्या. शिक्षकांची भूमिका केवळ ज्ञानदानापुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या मानसिक विकासातही महत्त्वाची आहे असे डॉ. गोराणे यांनी नमूद केले. या प्रसंगी सिस्टेल इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष घरटे, मुख्याध्यापिका दिव्या, समन्वयक मोनाली यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
Marathi News Esakal
www.esakal.com