संक्षिप्त

संक्षिप्त
Published on
संक्षिप्त --------- फोटो २० तारखेत FZ126B09094 फैजपूर : स्कायविन स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करताना. ------------------------ ‘स्कायविन’मध्ये शाळा प्रवेशोत्सव फैजपूर : येथील स्कायविन स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७चा ‘प्रवेश उत्सव’ सोहळा उत्साही वातावरणात नुकताच झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे संस्थेच्या वतीने अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. या सोहळ्याला प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी व सिनिअर केजी या पूर्वप्राथमिक विभागातील चिमुकल्या मुलांसह पालकांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती. यावेळी चिमुकल्यांचे शिक्षिका तनुजा सराफ, भाग्यश्री भंगाळे, कीर्ती चौधरी यांनी औक्षण करून स्वागत करण्यात आले. प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने आयोजित विशेष सत्रात मुख्याध्यापक व शिक्षिकांनी उपस्थित पालकांशी संवाद साधला.
Marathi News Esakal
www.esakal.com