तृतीयपंथीयांसाठी आज विशेष शासकीय शिबिर

तृतीयपंथीयांसाठी आज विशेष शासकीय शिबिर
Published on
तृतीय पंथीयांसाठी आज शासकीय शिबिर नंदुरबार : केंद्र सरकारच्या तृतीयपंथी हक्क संरक्षण कायद्यांतर्गत जिल्ह्यातील तृतीयपंथीयांचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी मंगळवारी (ता. २३) विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे शिबिर पार पडेल, अशी माहिती समाजकल्याण सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी दिली. शिबिरामध्ये तृतीयपंथीयांना अधिकृत प्रमाणपत्र व ओळखपत्र वाटप केले जाईल. रेशनकार्ड सहाय्य, विशेष मतदार नोंदणी मोहीम आणि हक्कांच्या संरक्षणासाठी कायदेविषयक मोफत सल्ला व मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार आहे. स्थानिक सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांनी या उपक्रमाची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवून सहकार्य करावे, असे आवाहन सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com