अलवाडी- देशमुखवाडी रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी

अलवाडी- देशमुखवाडी रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी
Published on
NSK26H22244 अलवाडी (ता. चाळीसगाव) ः देशमुखवाडी रस्त्याची खडी निघाल्याने झालेली दूरवस्था. अलवाडी- देशमुखवाडी रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी सकाळ वृत्तसेवा अलवाडी (ता. चाळीसगाव), ता. २२ ः येथील देशमुखवाडी रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून अत्यंत दूरवस्था झाली आहे. सायगाव ते देशमुखवाडी हा सुमारे सात किलोमीटरचा रस्ता आहे. त्यापैकी सायगाव ते अलवाडी हा रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र, हे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी लहानमोठे खड्डे पडले आहे. पावसामुळे हा रस्ता आणखीनच खराब होण्याची शक्यता लक्षात घेता तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अलवाडी ते देशमुखवाडी हा सुमारे चार किलोमीटरचा रस्ता आहे. सद्यःस्थितीत रस्त्यावरील खडी वर निघून आल्याने वाहने चालवताना वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात येथील रावसाहेब पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाला निवेदन दिले. मात्र, त्याची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काही ठिकाणी तर रस्त्याचे काम अर्धवट व निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या रस्त्यावर लहानमोठे अपघात देखील होत असतात. त्यामुळे संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेऊन या रस्त्याचे नव्याने चांगल्या दर्जाचे साहित्य वापरुन डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे. --------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com