घरेलू कामगार हक्क जनजागृती

घरेलू कामगार हक्क जनजागृती
Published on
धुळे टुडे २ साठी... --- फोटो-NSK26H22237 धुळे : मोतीनगर परिसरात घरेलू कामगारांच्या हक्कांबाबत जनजागृतीप्रसंगी नवनिर्मिती घरेलू कामगार संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह घरेलू कामगार महिला. --- घरेलू कामगारांच्या हक्कांबाबत मोतीनगरात जनजागृती अभियान --- आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिनानिमित्त नवनिर्मिती संघटनेतर्फे आयोजन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिनानिमित्त नवनिर्मिती घरेलू कामगार संघटनेतर्फे धुळे शहरातील मोतीनगर परिसरात घरेलू कामगारांच्या हक्कांबाबत रिक्षाद्वारे जनजागृती करण्यात आली. या अभियानातून नागरिकांमध्ये घरेलू कामगारांच्या सामाजिक सुरक्षा, सन्मान, न्याय व कामगार हक्कांविषयी जागृती करण्यात आली. तसेच, पत्रकांचे वितरण करून घरेलू कामगारांच्या विविध मागण्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. संघटनेने यावेळी महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा संहिता नियम- २०२६ मध्ये घरेलू कामगारांची स्वतंत्र नोंदणी करण्याची मागणी केली. तसेच, घरेलू कामगारांना कामगार राज्य विमा योजना, पेन्शन व इतर सामाजिक सुरक्षा लाभ लागू करावेत, वेतन संहितेमध्ये घरेलू कामगारांचा स्पष्ट समावेश करून किमान वेतनाची हमी द्यावी आणि स्थानिक स्तरावर तक्रार निवारण समित्या स्थापन कराव्यात अशा प्रमुख मागण्याही करण्यात आल्या. संघटनेचे राज्य समन्वयक शाहाजी शिंदे यांनी घरेलू कामगार समाजाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देत असले तरी त्यांना अद्याप मूलभूत हक्कांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांना सामाजिक सुरक्षा आणि कायदेशीर संरक्षण मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. दीपिका घोरपडे, पूजा मोरे, पुष्पांजली रायते, उषा मिस्त्री, शोभा राठोड, माधुरी लोहार, कल्पना भंडारकर, आफरीन शेख यांच्यासह संघटनेच्या महिला कार्यकर्त्या व घरेलू कामगार भगिनी या अभियानात सहभागी झाल्या. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com