धुळे : टुडे पान ३ साठी..
--
आयबीपीएस कॉलेजचे ‘फार्मसी’त यश
--
डिप्लोमा इन फार्मसी निकालात राखली निकालाची परंपरा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २२ : बोरकुंड (ता. धुळे) येथील इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान संचलित आयबीपीएस कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा इन फार्मसीच्या परीक्षेत यंदाही यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकत्याच घोषित झालेल्या या निकालात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
निकालात प्रथम वर्ष डिप्लोमा इन फार्मसीमध्ये ममता जालिंदर माळी हिने ७९.३० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. चेतना सावता माळी हिने ७६ टक्के गुणांसह द्वितीय तर हर्षदा प्रवीण बिराडे हिने ७२.१० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला. द्वितीय वर्षाच्या निकालातही विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. यात सुरेश त्र्यंबक बाविस्कर याने ७०.७३ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. तृणाली दीपक शिरोळे हिने ६९.७३ टक्के गुणांसह द्वितीय तर तेजस्विनी नथू माळी हिने ६९.६४ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे, सचिव तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शालिनी भदाणे यांच्यासह प्राचार्य डॉ. राजेश अहिरराव, डॉ. दीपिका पंडित, प्रा. हितेश नावारकर, प्रा. तृणाल सोनवणे, प्रा. संस्कार बनछोड, प्रा. यशवर्धन निंबाळकर, प्रा. केतन कठाळे आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.