योग दिनाच्या बातमीत समाविष्ट करावी.
-
फोटो क्रमांक : 22250
गोंदुर (ता. धुळे) : निकम कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये योगासने करताना विद्यार्थिनी, प्राध्यापक आदी.
-
निकम फार्मसी
गोंदुर (ता. धुळे) येथील प्रा. रवींद्र निकम कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जागतिक योग दिन साजरा झाला. यावेळी डॉ. विजय पाटील यांनी सभागृहात सर्वांकडून योग प्रात्याक्षिके करून घेतली. तर प्राध्यापकांनी निरोगी आयुष्यासाठी योगाचे महत्त्व विशद केले.
ओंकार बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र निकम, सचिव प्रा. शुभांगी निकम, उपाध्यक्ष रोहित निकम, बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अविनाश पाटील, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सागर जाधव उपस्थित होते. डॉ. जसवंत लामले यांनी सूत्रसंचालन केले.