अवतीभवती

अवतीभवती
Published on
अवतीभवती- धुळे टुडे २ साठी... --- फोटो- NSK26H22248 (फोटो क्रॉप करुन वापरावा) धुळे : विद्याधन महाविद्यालयात बीसीए परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविणारी उत्कर्षा पाटीलचा सत्कार करताना मान्यवर. विद्याधन महाविद्यालयाची उत्कर्षा पाटील प्रथम धुळे : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष बीसीए परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत वलवाडी येथील विद्याधन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली. महाविद्यालयातील प्रथम तीन विद्यार्थी असे : प्रथम- उत्कर्षा पाटील (७७.५२), द्वितीय- शामकांत चव्हाण (७७.४५), तृतीय- उन्नती बोरसे (७७.१९). उर्वरीत सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शारदा पाटील, प्राचार्य डॉ. के. बी. पाटील, संस्थेचे सचिव हर्शल पाटील, संचालिका डॉ. जागृती पाटील, संगणकशास्त्र विभागाच्या प्रा. ललीता निकम, प्रा. दिव्या पाटील, प्रा. शुंभागी सोनवणे, प्रा. स्वानंदी बेडसे, प्रा. गिरीशचंद्र पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. योगेश बोरसे, प्रा. दीपाली पाटील यांनी कौतुक केले. उत्कर्षा पाटीलचा सत्कारही केला. --- मोहाडी उपनगर येथे कबड्डी पंच परीक्षा धुळे : जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने ५ जुलै २०२६ ला सकाळी दहाला मोहाडी उपनगर येथील श्री पिंपळादेवी माध्यमिक विद्यालयात जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या पंच परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना राज्य पंच परीक्षेत बसण्याची संधी उपलब्ध होईल. या परीक्षेसाठी २८ जुनपर्यंत नावनोंदणी आवश्यक आहे. या पंच परीक्षेत जास्तीत जास्त क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटक, क्रीडा मंडळ व जिल्हा राष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी मुजफ्फरअली सय्यद यांनी केले आहे. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com