फोटो - NSK26H22258
पुरणगाव : येथील आत्मा मालिक गुरुकुलात आयोजित कार्यक्रमप्रसंगी ध्यक्ष हनुमंतराव भोंगळे, संत भागवत गिरी महाराज, प्राचार्य राजेश पाटील, मुख्याध्यापक योगेश सोनवणे व राहुल नरोडे.
आत्मा मालिक गुरुकुलात
शालेय साहित्याचे वाटप
सकाळ वृत्तसेवा
पुरणगाव, ता. २२ : आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी शालेय साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यात आली.
या वेळी गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंतराव भोंगळे, संत भागवत गिरीजी महाराज, प्राचार्य राजेश पाटील, मुख्याध्यापक योगेश सोनवणे व राहुल नरोडे, पर्यवेक्षक तेजस राऊत, शिक्षकवृंद तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गीत तर सुनीता वाघ, शीतल महाले, प्रियंका फाटककर, रामदास वाघ यांची स्वागतपर भाषणे झाली. मल्लखांब दिनाचे औचित्य साधत क्रीडा शिक्षक प्रवीण घोगरे यांनी मल्लखांबाचे महत्त्व स्पष्ट केले. शाळेतील विविध शैक्षणिक, क्रीडा व संस्कारवर्धक उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली. गुरुकुलातील शिक्षकांनी सादर केलेली नाटिका व ‘देवा मला शाळेत जायचं हाय’ आणि ‘स्कूल चले हम’ हे सामूहिक नृत्य आकर्षण ठरले. प्रतिभा मगर आणि मनिषा गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले.