पावसाची हजेरीने शेतकऱ्यांत समाधान

पावसाची हजेरीने शेतकऱ्यांत समाधान
Published on
फोटो -15316 मालेगाव : वासोळ शिवारात झालेल्या पावसाने शेतात साचलेले पाणी. ---- मालेगावात पहिल्या पावसाचे आगमन २५ मि.मी.पावसाची नोंद; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. २२ : शहरासह कसमादे परिसरात सोमवारी (ता. २२) मान्सूनच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली. कमी-अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामाबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पेरण्या खोळंबल्या होत्या. पावसाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटल्यानंतरही परिसरात उन्हाळ्यासारखे कडक ऊन पडत होते. गेल्या तीन आठवड्यांपासून तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविले जात होते. सोमवारी झालेल्या पावसामुळे तापमानात घट होऊन पारा ३५.२ अंशांवर आला. शहर व परिसरात सुमारे २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शेती मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. पाऊस लांबल्याने पेरण्या रखडल्या होत्या. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांवर ताण निर्माण झाल्याने पाणीटंचाईची तीव्रताही वाढली होती. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असूनही पाऊस हुलकावणी देत होता. सोमवारी दुपारपर्यंत ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. मात्र दुपारनंतर मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. कसमादे परिसरातील बहुतांश भागांत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाल्यास खरीप पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com