रात्रीचे कचरा संकलन

रात्रीचे कचरा संकलन
Published on
धुळे टुडे २ साठी मेन... --- फोटो- NSK26H22259 धुळे : साक्रीरोड भागात रात्री सुरु असलेले कचरा संकलन. --- धुळ्यात रोज रात्री दहा टनांवर कचरा संकलन --- शहराच्या विविध भागात रात्री नियमित घंटागाड्या; कचरा फेकणाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : महापालिकेतर्फे शहराच्या विविध व्यावसायिक भागात रात्री कचरा संकलन सुरु करण्यात आले आहे. रात्री कचरा संकलनाच्या या प्रयोगातून रोज सुमारे दहा ते अकरा टन कचरा संकलन होत आहे. त्यामुळे उघड्यावर कचरा फेकणाऱ्यांना हळूहळू लगाम लागत असल्याचे महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाचे कर्मचारी सांगतात. शहरातील कचरा संकलनाचे काम नियमित होत नसल्याने विविध भागात कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात. आजही अनेक भागात असे ढीग पाहायला मिळतात. विशेषतः फेरीवाले, दुकानदार व इतर व्यावसायिकांकडून उघड्यावर कचरा फेकण्याचा प्रकार होतो. त्यातुन समस्या अधिक गंभीर बनते. घरोघरी कचरा संकलनही नियमित होत नसल्याने घरातला कचराही नागरिक नंतर कुठेतरी फेकून मोकळे होतात. शहरातील अनियमित कचरा संकलन व अस्वच्छतेचा हा प्रश्‍न ‘सकाळ’नेही मांडला. त्यानंतर महापालिकेकडून काही उपाययोजना सुरु करण्यात आल्या. यात रात्रीच्या सत्रातही कचरा संकलन सुरु करण्यात आले. प्रारंभी या प्रयोगाला फारसा प्रतिसाद लाभत नव्हता. मात्र, नियमितपणे घंटागाड्या विविध भागात जात असल्याने आता बऱ्यापैकी कचरा संकलन होत असल्याचे मनपा कर्मचारी म्हणतात. शहरातील पेठ भाग, आग्रारोड, पाचकंदील, महात्मा गांधी पुतळा, महापालिकेची जुनी इमारत, महापालिका, पारोळा रोड, साक्रीरोड, जयहिंद कॉलेज परिसर, वाडीभोकर रोड, देवपूरातील दत्त मंदिर परिसर आदी भागांत रात्री कचरा संकलन करण्यासाठी १५ घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी साडेसात ते रात्री अकरा वाजेपर्यंत या घंटागाड्या कचरा संकलन करतात. यातून रोज सुमारे दहा ते अकरा टन कचरा संकलन होत आहे. संपर्कासाठी क्रमांक रात्रीचे कचरा संकलन सुरु केल्यानंतर प्रारंभी व्यावसायिक, दुकानदार, फेरीवाले कचरा टाकण्यास टाळाटाळ करत होते. मात्र, संबंधित व्यावसायिकांना स्वच्छता विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. घंटागाडी कर्मचाऱ्यांकडेही कचरा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. त्यामुळे आवश्यकतेनुसार दोन्ही बाजूंनी आता कचरा संकलनाबाबत संपर्क होतो. त्यातून रात्रीच्या कचरा संकलन प्रयोगाला बऱ्यापैकी प्रतिसाद लाभत आहे. --- ...कोट... शहराच्या विविध भागात रात्रीचे कचरा संकलन नियमितपणे सुरु आहे. अनेक व्यावसायिकांना आता रात्री घंटागाडीत कचरा टाकण्याची सवय लागली आहे. मनपा कर्मचारी, घंटागाडी कर्मचारीही याबाबत कचरा निर्माण करणाऱ्या व्यावसायिकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे यापूर्वी उघड्यावर फेकला जाणारा कचरा आता थेट घंटागाडीत येत आहे. त्यामुळे रात्री कचरा संकलनाचा हा प्रयोग यशस्वी होत असल्याचे दिसते. फेरीवाले, दुकानदार व इतर व्यावसायिकांनी घंटागाडीतच द्यावा, घंटागाडीबाबत काही अडचणी असल्यास कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. - विकास साळवे, स्वच्छता निरीक्षक, मनपा धुळे ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com