लोककल्याण मेळावा

लोककल्याण मेळावा
Published on
धुळे टुडे २ साठी अँकर... --- धुळे मनपात २५ जूनला लोककल्याण मेळावा --- पीएम स्वनिधी योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश, क्रेडिट कार्डचे होणार वाटप सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी व शहरातील पथविक्रेत्यांच्या (फेरीवाले) प्रगतीसाठी १ ते ३० जुनदरम्यान विविध स्तरांवर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. याच मोहिमेचा एक भाग २५ जूनला दुपारी चार ते सायंकाळी सहादरम्यान धुळे महापालिका सभागृहात ‘लोक कल्याण मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. पथविक्रेत्यांना डिजिटल सक्षम करणे, बँकर आणि पथविक्रेते यांच्यात थेट संवाद घडवून आणणे आणि योजनेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सेवा पोहोचवणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कर्ज प्रस्तावांच्या लाभार्थ्यांना मेळाव्यात थेट धनादेश आणि पात्र लाभार्थ्यांना क्रेडिट कार्डचे वाटप केले जाईल. जे लाभार्थी आपल्या कर्जाची नियमित परतफेड करत आहेत अशा प्रामाणिक लाभार्थ्यांना डिजिटल व्यवहारांसाठी ‘क्यूआर कोड’ (QR Code) दिले जातील. तसेच युपीआय (UPI) आणि डिजिटल ऑन-बोर्डिंग सुविधेचे थेट प्रात्यक्षिक दाखवून माहिती दिली जाईल. या मेळाव्यात मनपा आयुक्त नितीन कापडणीस लाभार्थ्यांना मार्गदर्शन करतील. तसेच शहरातील प्रमुख वित्तीय संस्थांचे प्रतिनिधी, शिखर बँकेचे व्यवस्थापक, डिजिटल पेमेंट भागिदार आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी होऊन पथविक्रेत्यांना मार्गदर्शन करतील. धुळे शहरातील सर्व पात्र पथविक्रेते व नागरिकांनी या लोककल्याण मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन धुळे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. यासाठी मेळावे, शिबिरे १ ते ३० जून या काळात हे अभियान जिल्हास्तर, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थास्तर, जनगणना शहरस्तर अशा तीन स्तरांवर राबविले जात आहे. लाभार्थ्यांच्या यशोगाथा साजऱ्या करण्यासाठी ‘स्वनिधी महोत्सवा’चे आयोजन, कर्ज आणि क्रेडिट कार्ड सुलभ करण्यासाठी लोक कल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच पथविक्रेत्यांची ओळख पटवून त्यांना संघटित करण्यासाठी विशेष ‘स्वनिधी शिबिरे’ घेण्यात येणार आहेत. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com