दोन कॉलम
--------------------
२२२६०
नाशिक : ‘यीप- २०२६’ च्या उद्घाटन प्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ. शोभाताई बच्छाव, महापौर हिमगौरी आडके यीप पदाधिकारी, विद्यार्थी.
यंग इंडियन्स नाशिकतर्फे
‘यीप २०२६’ उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २३ : युवा नेतृत्व घडवण्याच्या उद्देशाने कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या यंग इंडियन्स नाशिकतर्फे ‘यंग इंडियन्स पार्लमेंट- यीप २०२६’ या दोन दिवसीय उपक्रमाचे आयोजन विझ्डम हाय इंटरनॅशनल स्कूल मध्ये उत्साहात पार पडले.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, चिकित्सक विचारशक्ती, सार्वजनिक वक्तृत्वकला आणि लोकशाही मूल्यांची जाणीव वाढवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. संसदीय कामकाजाची प्रत्यक्ष अनुभूती देत समकालीन विषयांवर सखोल चर्चा आणि विचारमंथनासाठी यीप हे प्रभावी व्यासपीठ ठरले.
कार्यक्रमात विझ्डम हाय ग्रुप ऑफ स्कूल्स, रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल, न्यू एरा स्कूल, युनिव्हर्सल अकॅडमी, सिंधू सागर स्कूल, अशोका स्कूलसह विविध शाळांमधील १०६ हून अधिक युवा प्रतिनिधींनी सहभाग घेतला. खासदार राजाभाऊ वाजे, डॉ. शोभा बच्छाव आणि महापौर हिमगौरी आडके यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत लोकशाही प्रक्रियेतील सक्रिय सहभाग, नेतृत्व आणि जबाबदार नागरिकत्वाचे महत्त्व अधोरेखित केले. पारुल धाडीच आणि सह प्रमुख उज्ज्वल चांडक यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात आली.
राष्ट्रीय युवा सह प्रमुख वेदांत राठी आणि हर्ष देवधर यांनीही उपस्थित राहून युवकांच्या भूमिकेवर संवाद साधला. कमलेश ठाकूर आणि रुधी गायकवाड यांनी केले.