आंतरराष्ट्रीय योग दिना

आंतरराष्ट्रीय योग दिना
Published on
२२२६१ नाशिक : यंग इंडियन्स नाशिकतर्फे आयोजित उपक्रमात सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक सामूहिक योग करताना. ----------- यंग इंडियन्सतर्फे योग दिन उत्साहात सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या युवा विभाग यंग इंडियन्स नाशिक चॅप्टरतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजित करण्यात आला. योग उपक्रमात ८ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग नोंदवला. विविध शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये पार पडलेल्या या उपक्रमातून योग, आरोग्य आणि शिस्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. देशभरातील यंग इंडियन्सच्या चॅप्टर्समध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांपैकी सर्वाधिक सहभाग नाशिकमध्ये नोंदवला गेल्याने यंदाचा योग दिन विशेष ठरला. उपक्रमाचे नेतृत्व ॲड. सुरभी तोष्णीवाल यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वी समन्वयात कमलेश ठाकूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, आत्मविश्वास आणि शिस्तीची जाणीव विकसित होते. भावी नेतृत्व घडविण्यासाठी सर्वांगीण विकासाला चालना देणारे उपक्रम महत्त्वाचे आहेत, असे पारुल धाडीच आणि सह प्रमुख उज्ज्वल चांडक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com