नाशिक उपकेंद्राचे त्‍वरीत उद्‌घाटन करा

नाशिक उपकेंद्राचे त्‍वरीत उद्‌घाटन करा
Published on
‘नाशिक उपकेंद्राचे त्‍वरीत उद्‌घाटन करा’ सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र तातडीने सुरु करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. यासंदर्भात सहाय्यक कुलसचिव श्रीपाद बुरकुले यांची भेट घेत चर्चा केली. विद्यापीठाने ठोस निर्णय न घेतल्‍यास येत्‍या काळात आंदोलन छेडणार असल्‍याची माहिती मनविसेचे सरचिटणीस गजानन काळे यांनी दिली. मनसे कार्यालय राजगड येथे झालेल्‍या पत्रकार परीषदेस मनविसे सरचिटणीस ॲड.स्‍नेहल आडारकर, प्रमुख संघटक मिलिंद घाग, प्रशांत कनोजिया, सचिव प्रमोद मांढरे, सोनाली पाटील आदी पदाधिकारी उपस्‍थित होते. काळे म्‍हणाले, की मोठ्या संघर्षानंतर पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र उभे राहात आहे. शिवनई (ता.दिंडोरी) येथे ६४ एकर जागा उपलब्‍ध झालेली असताना, केवळ प्रशासकीय इमरतीचे बांधकाम केले आहे. उर्वरित घोषणांची अद्यापपर्यंत पूर्तता करण्यात आलेली नाही. तसेच इमारत बनून तयार असतांना, केवळ विद्यापीठ प्रशासनाच्‍या दुर्लक्षामुळे उपकेंद्राचे उद्‌घाटन होऊ शकलेले नाही. यासंदर्भात विद्यापीठ अधिकार्यांना आम्‍ही जाब विचारला. तसेच जुलैपर्यंत उपकेंद्राचे उद्‌घाटन झाले नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असल्‍याचे काळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com