रस्त्यांवरील धोकादायक वीज पुरवठा यंत्रणा तातडीने व्यवस्थित करा

रस्त्यांवरील धोकादायक वीज पुरवठा यंत्रणा तातडीने व्यवस्थित करा
Published on
सेकंड मेन NSK26H22267 जळगाव : शहरातील वीजपुरवठा यंत्रणेबाबत महावितरण अधिकारी यांच्याशी चर्चा करताना आयुक्त आदित्य जिवने. --- धोकादायक वीजपुरवठा यंत्रणा तातडीने व्यवस्थित करा महावितरण अधिकाऱ्यांना मनपा आयुक्तांकडून सूचना; अनधिकृत बॅनरधारकांवर कारवाई करा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : शहरातील नागरिकांची सुरक्षा आणि शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी महावितरण अधिकाऱ्यांसोबत सोमवारी विशेष बैठक घेतली. यात शहरातील मुख्य रस्त्यांसह अनेक ठिकाणी धोकादायक उघड्या रोहित्र पेटीचे झाकण उघडे असणे (डीपी), धोकादायक स्थितीतील वीजवाहिन्या त्वरित व्यवस्थित करण्याच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. शनिवार व रविवारी शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी ही बैठक बोलावली होती. पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यालगत धोकादायक अवस्थेत वाढलेल्या झाडांच्या फांद्या, वीजवाहिन्यांच्या संपर्कात आलेल्या झाडांच्या शाखा, लोंबकळणाऱ्या वीजतारा, जीर्ण व वाकलेले विद्युत खांब तसेच उघड्या स्थितीतील ट्रान्स्फॉर्मर आढळून आले होते. अधिकाऱ्यांना सूचना बैठकीस महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गोपाल महाजन यांच्यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्या तातडीने छाटण्याच्या सूचना दिल्या. तसेच शहरातील चौक, रस्ते आणि दुभाजकांमध्ये असलेल्या उघड्या ट्रान्स्फॉर्मरची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक जाळी किंवा सुरक्षित कवच बसविण्याचे निर्देश दिले. २०० अनधिकृत बॅनर जप्त दरम्यान, शहर पाहणीदरम्यान अनेक ठिकाणी परवानगीविना लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर, फ्लेक्स आणि होर्डिंगही आयुक्तांच्या निदर्शनास आले. याबाबत आयुक्तांनी बैठक घेऊन त्यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शहरातून सुमारे २०० अनधिकृत बॅनर जप्त करण्यात आले आहेत. चौकट दंडात्मक कारवाई करा आयुक्तांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांना संबंधित व्यक्ती, संस्था आणि जाहिरातदारांना स्वतःहून अनधिकृत फलक हटविण्याचे सांगावे. तरी देखील बॅनर, होर्डिंग दिसून आल्यास संबंधितांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com