NSK26H22275
अक्राळे : येथे क.का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी.
---------
अक्राळे गावात होणार कृषिसंस्कृतीचा जागर
कृषिदुतांकडून आधुनिक शेती तंत्रज्ञानाची होणार जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
दिंडोरी, ता. २२ : तालुक्यातील अक्राळे येथे क. का. वाघ उद्यानविद्या महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी उद्योग आधारित कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे अक्राळे गावात आगमन झाले. या कृषिदूतांमध्ये कार्तिक जाधव, विशाल लोखंडे, अतुल जाधव, समाधान बोडके आणि अभिषेक गटकळ यांचा समावेश आहे.
कृषिदूतांनी सरपंच अर्चना डांगळे, ग्रामपंचायत अधिकारी अनिल ढेरिंगे यांची भेट घेतली. सरपंच डांगळे यांनी गावातील शेतीची प्रमुख वैशिष्ट्ये, विविध पिकांची लागवड पद्धती, पाण्याची उपलब्धता व कमतरता तसेच शेतकऱ्यांसमोरील विविध समस्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. पुढील काही दिवसांत कृषिदूतांकडून शेतभेटी, मृदा परीक्षण, पिकांच्या वाढीचे निरीक्षण, कीड व रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानावर आधारित विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येणार आहे. याशिवाय शाश्वत शेती, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन आणि फळबाग लागवडीसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याची माहिती कृषिदूतांनी दिली.
वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, सचिव के. एस. बंदी, समन्वयक डॉ. व्ही. एम. सेवलीकर, प्राचार्य व्ही. एस. संधान, प्रा. पी. एस. बस्ते, प्रा. के. जे. गुळवे, प्रा. पी. एम. क्षीरसागर, प्रा. डी. एस. गांगुर्डे, प्रा. एन. एस. घोगरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. एस. देवरे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.