धुळे मॉन्सूनचे आगमन

धुळे मॉन्सूनचे आगमन
Published on
धुळे ः टुडे १ साठी, मेन -- फोटो क्रमांक ः 22271 आणि 01015 आणि 22272 पिंपळनेर : शहरात सोमवारी झालेल्या पावसामुळे उद्‍भवलेली स्थिती. दुसऱ्या छायाचित्रात मेन्स पार्लरमध्ये शिरलेले पाणी. शेवटच्या छायाचित्रात धुळे शहरात पावसाचा शिडकावा झालेला लहान पूल. -- मॉन्सूनचे आगमन; धुळ्यासह ग्रामीण भागात हजेरी - पिंपळनेर परिसरात मुसळधार; वरूण राजाच्या कृपेमुळे बळीराजाच्या आशा पल्लवीत - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र ८ ते २२ जून दरम्यान असलेला मृग नक्षत्राचा कालावधी सोमवारी (ता. २२) संपला. या नक्षत्राच्या अखेरच्या दिवशी सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी मॉन्सूनचे आगमन झाले. धुळे शहरात रविवारी (ता. २१) मध्यरात्रीनंतर आणि सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास हलका शिडकावा झाला, तर पिंपळनेरसह (ता. साक्री) संपूर्ण पश्चिम पट्ट्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. लामकानी व बोरीस (ता. धुळे) परिसरातही दुपारी पावसाने हजेरी लावली. यामुळे काही महिन्यांपासून कडक उन्हाच्या व उकाड्याच्या झळांनी हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. - पिंपळनेर जलमय पिंपळनेर : शहर व परिसरात सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. ढग दाटून येत सुमारे अडीच तास झालेल्या या जोरदार पावसामुळे रस्ते, प्रमुख चौक आणि सखल भाग जलमय झाले होते. काही काळ समोरील दृश्यही दिसेनासे झाले होते. जोरदार पावसामुळे मुख्य बाजारपेठेतील वाहतुकीचा वेग मंदावला, तर काही भागांतील वीजपुरवठा तात्पुरता खंडित झाला होता. या पावसामुळे उकाड्यापासून सुटका झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला, तर शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. - मेन्स पार्लरमध्ये पाणी सामोडे : पिंपळनेरमधील गणपती चौक व टपाल कार्यालयासमोरील रस्त्यावर साचलेले पावसाचे पाणी एका बँकेखाली असलेल्या मेन्स पार्लरमध्ये शिरले. यामुळे व्यावसायिक गणेश जगताप यांच्या फर्निचरचे व अन्य साहित्याचे नुकसान झाले. प्रभाग आठमध्ये सध्या काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याची उंची वाढविल्याने आणि पाण्याचा निचरा करणारे चेंबर व नाले तुंबल्याने हे पाणी दुकानात शिरल्याचा आरोप नागरिकांनी केला. अखेर नगर परिषदेच्या वाहनाने दुकानात शिरलेले पाणी बाहेर काढले. नगर परिषदेच्या या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त करत, नाले सफाई व नुकसान भरपाईची मागणी केली आहे. - सोनगीर परिसरास दिलासा सोनगीर : सोनगीर शहरासह दापुरा, दापुरी, सरवड, देवभाने, सोंडले, सार्वे, वायपूर, चांदगड, पिंपरखेडे, कलमाडी आदी परिसरात दुपारी पावणेदोनच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. मात्र, हा पाऊस केवळ अर्धा तास झाल्याने शेती व विहिरींसाठी त्याचा फारसा उपयोग होणार नाही. यंदा हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकरी वर्ग आधीच चिंतेत आहे. त्यातच रविवारी रात्री आणि सोमवारी झालेला पाऊस अपुरा असल्याने पेरण्यांसाठी अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद मात्र लहान मुलांनी यथेच्छ लुटला. - शिरपूरला नुसतीच हजेरी शिरपूर : शहर व परिसरात सोमवारी सकाळपासूनच दमट वातावरणामुळे उकाडा वाढला होता. दुपारी अडीचच्या सुमारास ढगाळ वातावरण होऊन वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पावसाच्या सरी कोसळल्याने हवेत गारवा निर्माण झाला. मात्र, कोरडवाहू शेतकऱ्यांच्या मते, हा पाऊस शेतीसाठी अत्यंत अपुरा आहे. उष्णतेचे प्रमाण जास्त असल्याने जमीन अद्याप तापलेली आहे; त्यामुळे दमदार पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करता येणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांनी आधीच शेतमशागतीची कामे पूर्ण करून खते व बियाण्यांची खरेदी करून ठेवली आहे. सोमवारी झालेल्या या पावसामुळे खरीप हंगामाला चांगला प्रारंभ होण्याची अपेक्षा असून, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पेरणीयोग्य दमदार पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. --- ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com