धुळे पाऊस- खानदेश पान

धुळे पाऊस- खानदेश पान
Published on
धुळे जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २२ : मृग नक्षत्राच्या अखेरच्या दिवशी सोमवारी (ता. २२) धुळे शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मॉन्सूनने हजेरी लावली. यामुळे उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. धुळे शहरात रविवारी (ता. २१) मध्यरात्री व सोमवारी दुपारी पावसाचा हलका शिडकावा झाला. लामकानी व बोरीस (ता. धुळे) परिसरातही पावसाने हजेरी लावली. साक्री तालुक्यातील पिंपळनेर व पश्चिम पट्ट्यात विजांच्या कडकडाटासह सुमारे अडीच तास मुसळधार पाऊस झाला. यामुळे पिंपळनेर भागात रस्ते व सखल भाग जलमय झाले; तर काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. दुसरीकडे, पिंपळनेर (ता. साक्री) व सोनगीर (ता. धुळे) आणि शिरपूर परिसरात दुपारी अर्धा तास पावसाच्या सरी कोसळल्या. जमीन अद्याप तापलेली असल्याने पेरण्यांसाठी हा पाऊस अपुरा असून, शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तरीही त्याच्या या पहिल्या हजेरीमुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com