नेहरु नगरातील शिक्षकाचे घर फोडून ऐवज लंपास

नेहरु नगरातील शिक्षकाचे घर फोडून ऐवज लंपास
Published on
शहर टुडे पान तीनसाठी ----------------- नेहरू नगरात शिक्षकाचे घर फोडून ऐवज लंपास जळगाव : येथील मोहाडी रोडवरील नेहरू नगर परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे गोविंद रामदास पाटील (वय ५७, रा. नेहरू नगर, जळगाव) यांच्या राहत्या घरात आठ जूनला सकाळी साडेनऊ ते दहा जूनला दुपारी चारदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी घरातील सुमारे १५ हजार रुपये किमतीचे ६ चांदीचे देव (सुमारे ६० ग्रॅमचे), तीन हजार रुपये किमतीची एचपी कंपनीची गॅस शेगडी, पाच हजार रुपये किमतीची पितळी व तांब्याची भांडी असा एकूण २३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com