राज्यस्तरीय स्पर्धेत जळगावला तीन सुवर्ण पदके

राज्यस्तरीय स्पर्धेत जळगावला तीन सुवर्ण पदके
Published on
जळगाव शहर टुडे पान चारसाठी -------------------------- NSK26H22299 NSK26H22297 NSK26H22298 जळगाव : विजयी स्पर्धक माही भंगाळे, विराज सावळे, लिखित महाजन. ---------- राज्य रोलर स्केटिंग स्पर्धेत जळगावला तीन सुवर्णपदके सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २६ : रोलर स्केटींग स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित आठव्या रोलर स्केटींग स्पोटर्स स्पर्धा सोलोपुर येथे नुकतीच झाली. या स्पर्धेत जळगाव पोलिस दलाच्या स्केटींग क्लबच्या खेळाडू माही भंगाळे, विजय साळवे, लिखित महाजन यांनी सुवर्णपदके पटकावली. या स्पर्धेत एकूण ३०० खेळाडू सहभागी होते. त्यात माही भंगाळे, विराज साळवे व लिखित महाजन या स्पर्धकांनी ३०० व ५०० मिटर स्पर्धेत प्रत्येकी सुवर्णपदक पटाकवले. स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी जळगाव स्केटींग कल्बचे नाव या सुवर्ण अक्षरात गोंदले आहे. या खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक संदीप गावित, अपर अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गनापुरे, पोलिस उपअधीक्षक (गृह) प्रदीप ठाकूर, पोलिस निरीक्षक (वेल्फेअर) अरविंद भोळे यांनी सर्वांचे कौतुक करीत खेळाडूंच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विजयी स्पर्धकांना स्केटिंग प्रशिक्षक जागृती काळे-महाजन, अश्विनी निकम-जंजाळे, स्वप्नील निकम यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com