मेनच्या बाजूला सिंगल कॉलम जागेसाठी
---
राजकीय पक्षांनी
बीएलए’ त्वरीत नेमावे
जळगाव, ता.२३ : सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या मतदान केंद्रांवर तत्काळ ''बूथ लेव्हल एजंट'' (बीएलए) नियुक्त करावेत, असे मार्गदर्शन जळगाव शहर मतदार संघाचे मतदान नोंदणी अधिकारी विनय गोसावी यांनी केले.
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २० जूनपासून सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज श्री. गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राजकीय पक्षांची एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात ते बोलत होते.
या बैठकीला सहायय मतदार नोंदणी अधिकारी तथा निवडणूक नायब तहसीलदार नवीनचंद्र भावसार, नितीन माळी, राहुल वाघ, पितांबर भावसार (भाजप), वाय. एस. महाजन (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), जमील शेख (काँग्रेस), गजानन देशमुख (शिवसेना) या प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उपस्थित प्रतिनिधींना मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) कार्यक्रमाचे अधिकृत वेळापत्रक सविस्तर समजावून सांगितले. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, मॅप व अन मॅप मतदार याबाबत प्रशासनातर्फे विशेष मार्गदर्शन करण्यात आले. एसआयआर’ प्रणालीचे फायदे व तोटे यावरही बैठकीत सखोल चर्चा झाली. मतदार यादी अचूक आणि पारदर्शक व्हावी, यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे ठरले.
------