२० वर्षे जुन्या सभागृहाच्या नूतनीकरण करा

२० वर्षे जुन्या सभागृहाच्या नूतनीकरण करा
Published on
मनपाच्या वीस वर्षे जुन्या सभागृहाचे नूतनीकरण करा स्थायी समिती सभापतींची आयुक्तांकडे मागणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील मुख्य सभागृहाचे अत्याधुनिक पद्धतीने सुशोभीकरण व आधुनिकीकरण करण्याची मागणी स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी अधिकृत पत्र देऊन आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मान्यता देण्याची विनंती केली आहे. महापालिकेच्या या सभागृहात विविध प्रशासकीय बैठका, महासभा, स्थायी समितीच्या बैठका, विभागीय आढावा बैठका तसेच लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकांचे नियमित आयोजन केले जाते. मात्र, सुमारे २० वर्षांपासून वापरात असलेल्या या सभागृहाचे नूतनीकरण करणे काळाची गरज बनल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. सभागृहात या हव्यात सुविधा सभागृहात उच्च दर्जाचे इंटिरिअर, ध्वनिक्षेपक व्यवस्था, आधुनिक प्रकाशयोजना, डिजिटल डिस्प्ले प्रणाली, अद्ययावत ऑडिओ-व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा, एलईडी स्क्रीन, सेंट्रल कंट्रोल सिस्टीम, वातानुकूलन व्यवस्था, आकर्षक फॉल्स सिलिंग तसेच दर्जेदार आसनव्यवस्था आणि फर्निचर उभारण्याचा प्रस्तावित केले आहे. नूतनीकरण गरजेचे महापालिकेच्या अंदाजपत्रकात या कामासाठी तरतूद करण्यात आल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. वाढत्या प्रशासकीय गरजा आणि आधुनिक कार्यपद्धती लक्षात घेता हे नूतनीकरण आवश्यक असल्याचे सांगत संबंधित विभागाला पुढील कार्यवाहीचे निर्देश देण्याची मागणी डॉ. पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com