NSK26H22319
जळगाव : महापौर दीपमाला काळे यांना निवेदन देताना महानगर काँग्रेसचे अध्यक्ष जमील शेख आदी.
----
शहरातील बंद पथदीप त्वरित सुरू करा
महानगर काँग्रेसची मागणी; अजिंठा चौक ते सुप्रीम कॉलनीदरम्यान अंधार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२३ : शहरातील ५० टक्के पथदीप काही महिन्यांपासून बंद आहेत. काही वेळेस तक्रार दिल्यावर पथदीप २ ते ३ दिवस सुरू होतात व परत बंद होतात. बंद पथदीपांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. अंधारत मोकाट कुत्रे नागरिकांना चावा घेत असल्याच्या घटना घडत आहेत. महापालिकेच्या महापौरांनी त्वरित बंद पथदीप सुरू करण्याचे आदेश संबंधित वीज विभागाला द्यावेत, अशी मागणी आज महानगर कॉंग्रेसतर्फे महापौर दीपमाला काळे यांच्याकडे करण्यात आली.
महानगर काँग्रेसचे अध्यक्ष जमील शेख यांनी निवेदनात म्हटले आहे, की पथदीप बंदबाबत महापालिकेच्या अभियंत्यांकडे तक्रार केल्यास ते महावितरणकडे बोट दाखवितात व महावितरणचे अभियंता महापालिकेकडे बोट दाखवितात. यामुळे शहरातील बराच भाग अंधकारमय असतो. या कामाच्या ठेकेदारांसह महापालिका व महावितरण अधिकाऱ्यांना त्या सूचना द्याव्यात व पथदीप सुरळीत करण्यात यावेत व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना काँग्रेसचे सलीम इनामदार, अमजद पठाण, चंद्रकांत राजपूत, विशाल पवार, अनंत परिहार, विष्णू घोडेस्वार, सय्यद सादीक अली, ज्ञानेश्वर कोळी उपस्थित होते.