पान दोन
-------------------
22322
नाशिक रोड : योग दिनानिमित्त आसने करताना हास्य क्लबचे सदस्य.
सिद्धान, प्रथमेश, चिरतरुण, उत्साही
हास्य क्लबतर्फे योग दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक रोड, ता. २३ : जागतिक स्तरावर साजऱ्या करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गाडेकर मैदान येथे सिद्धान हास्य क्लब व प्रथमेश हास्य क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच चिरतरुण हास्य क्लब आणि उत्साही हास्य क्लब यांच्या सहकार्याने योग उत्साहपूर्ण वातावरणात झाला. योग, आरोग्य, आनंद आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ योगविशारद ब्रिजमोहन मुंदरा होते. त्यांनी निरोगी, तंदुरुस्त आणि उत्साही जीवन जगणाऱ्या दादाजींनी विविध योगासने, प्राणायाम, श्वसनक्रिया आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे उलगडून सांगितले.
अध्यक्षा सुशिला टाटिया यांनी योग व हास्ययोगाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना प्रेरित केले.
यावेळी नाशिक हास्य योग समन्वय समितीचे उपाध्यक्ष डी. जी. पाटील, उपाध्यक्ष व विभाग प्रमुख अश्विनी धोपावकर तसेच विभाग प्रमुख चंद्रकांत तेलंगी यांनी उपस्थितांना योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले व योगाच्या माध्यमातून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याचा संदेश दिला. डी. जी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत विधाते, नामदेवराव वाघ, चंद्रवदन कुलकर्णी, सिद्धान व प्रथमेश हास्य क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.