रोटरी क्लबतर्फे ज्ञान गौरव पुरस्कार प्रदान

रोटरी क्लबतर्फे ज्ञान गौरव पुरस्कार प्रदान
Published on
पान चार 22325 नाशिकः रोटरी क्‍लब ऑफ नाशिकतर्फे आयोजित कार्यक्रमात पुरस्‍कारार्थींसमवेत उपस्‍थित मान्‍यवर. -------------- रोटरी क्लबतर्फे ज्ञान गौरव पुरस्कार प्रदान अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर यांच्‍या उपस्‍थितीत कार्यक्रम सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.२३ः रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे क्लब अवॉर्ड्स ज्ञान गौरव २०२५-२६ चा सन्मान सोहळा नुकताच झाला. अभिनेत्री प्रिया तुळजापूरकर यांच्‍या उपस्‍थितीत पुरस्‍कारार्थींचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर होते. त्‍यांनी प्रास्‍ताविकात संस्‍थेची माहिती दिली. त्यानंतर रोटरी क्लब ऑफ नाशिकने वर्षभरात राबविलेल्या विविध प्रकल्प व कार्यक्रमांची चित्रफीत दाखविण्यात आली. परिचय ॲड. राजेश्वरी बालाजीवाले यांनी केला. त्यानंतर विविध प्रकल्पांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन प्रकल्प यशस्वीरीत्या राबविणाऱ्या सदस्‍य व संचालकांचा प्रिया तुळजापूरकर यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावर्षी रोटरी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ''बेस्ट प्रेसिडेंट'' अवॉर्ड रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ.गौरव सामनेरकर यांना प्रदान केला. रोटरीच्या ८२ वर्षाच्या इतिहासात हा सन्मान प्राप्त करणारे डॉ. सामनेरकर हे पहिले अध्यक्ष ठरले. सचिव सीए रेखा पटवर्धन व प्रकल्‍प सचिव मिलिंद चिंधडे यांना रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट''तर्फे उत्‍कृष्ट सचिव पुरस्काराने सन्मानित केले. ''बेस्ट रोटरेक्ट क्लब पुरस्कार डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयास प्रदान करण्यात आला. सामाजिक शैक्षणिक व सेवाभावी उपक्रमामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या फ्रावशी इंटरनॅशनल ॲकॅडमी, विझ्डम इंटरनॅशनल स्कूल, ग्लोबल व्हिजन इंटरनॅशनल स्कूल आणि जनता विद्यालय पवन नगर, सिडको या संस्थांना उत्कृष्ट ''इंटरॅक्ट क्लब'' पुरस्काराने सन्‍मानित केले. विविध प्रकल्प व कार्यक्रम अत्यंत उत्कृष्टरीत्या पार पाडल्याबद्दल सदस्‍यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्‍कार करण्यात आला. सूत्रसंचालन मकरंद चिंधडे, रचना चिंधडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com