धुळे : टुडे पान ३ साठी.. मेन
--
फोटो क्रमांक : 22220
--
पावणेदोन लाख बालकांना देणार पोलिओ डोस
--
धुळे जिल्ह्यात २८ जूनला मोहीम; दीड हजार केंद्रांवर होणार लसीकरण
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २३ : राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेंतर्गत रविवारी (ता. २८) जिल्ह्यामध्ये व्यापक प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील पाच वर्षांखालील एक लाख ८२ हजार ८४३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली. या महामोहिमेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने पूर्वतयारी पूर्ण केली असून ठोस कृती आराखडा तयार केला असल्याचे डॉ. बोडके यांनी सांगितले.
-
भारताला २०१४ मध्येच पोलिओमुक्त देश म्हणून दर्जा मिळाला असला तरी जागतिक स्तरावर काही देशांमध्ये अद्यापही पोलिओचे रुग्ण आढळत असल्याने सर्वोच्च सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. या अनुषंगाने हे लसीकरण होते आहे. मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, स्थानिक ग्रामपंचायती, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त सहकार्याने नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. तडवी यांनी दिली. ‘दोन थेंब जीवनाचे – प्रत्येक बालकासाठी सुरक्षित भविष्याचे’ हा मुख्य संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व पालकांना या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
-
विशेष मोबाईल पथके
प्रवासात असणाऱ्या व मजुरी करणाऱ्या कुटुंबांच्या सुविधेसाठी बसस्थानके, रेल्वे स्थानके, तसेच वीटभट्ट्या, स्थानिक बाजारपेठा, मोठी बांधकाम स्थळे, भटके-विमुक्त कुटुंबांच्या वस्त्या आणि ऊसतोड कामगारांच्या वसाहतींमध्ये ९१ विशेष मोबाईल पथकांमार्फत थेट जाऊन लसीकरण सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील कोणतेही पाच वर्षांखालील बालक या डोसपासून वंचित राहू नये, हे आपले मुख्य ध्येय आहे. सर्व पालकांनी आपल्या बालकांना जवळच्या केंद्रावर नेऊन पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन डॉ. बोडके यांनी केले आहे.
-
१४-१
..चौकट..
१४-१
दीड हजार लसीकरण केंद्र
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एक लाख ६६ हजार ६१३ बालकांना तर शहरी भागातील १६ हजार २३० बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस देण्यात येणार आहे. दुर्गम आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी जिल्ह्यात एक हजार ५०८ लसीकरण केंद्रे (बूथ) उभारण्यात येणार असून तीन हजार २६० प्रशिक्षित कर्मचारी या लसीकरण मोहिमेसाठी कार्यरत राहणार आहेत.