धुळे : टुडे पान ३ साठी..
--
फोटो क्रमांक : 22329
तरवाडे : येथे मागणीनुसार जलद बसेस थांबा मंजूर झाल्यानंतर थांबलेली बस. यावेळी उपस्थित ग्रामस्थ.
--
तरवाडे गावाला जलद बसेसचा थांबा
--
आमदार भदाणे यांच्या निर्देशानंतर अंमलबजावणी
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २३ : तरवाडे (ता. धुळे) गावाला अखेर अती जलद, जलद व निम जलद एसटी बसेसचा अधिकृत थांबा मंजूर झाला आहे. आमदार राम भदाणे यांच्या निर्देशानंतर आणि सततच्या पाठपुराव्यामुळे एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. सोमवार (ता. २२) पासूनच या सर्व गाड्या गावात थांबू लागल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ग्रामस्थांची आणि शाळकरी विद्यार्थ्यांची मोठी समस्या दूर झाली आहे.
-
तरवाडे ग्रामस्थांकडून गेल्या अनेक वर्षांपासून जलद बसेसना गावात थांबा मिळावा अशी सातत्याने मागणी केली जात होती. या समस्येची दखल घेत आमदार भदाणे यांनी एसटी महामंडळाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या विशेष आग्रहामुळे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक यांनी प्रत्यक्ष तरवाडे गावाला भेट दिली. त्यांनी स्वतः गावात बसेस थांबवून चालक व वाहकांना यापुढे येथे नियमित थांबा घेण्याच्या कडक सूचना दिल्या. यावेळी गणेश देसले, जितू माळी, डॉ. मनोज पाटील, नारायण जमादार, बापू जमादार, शाम पाटील, रणवीर जमादार, विकास पाटील, मनोहर पाटील, विजय माळी, नीतेश पवार, बाबाजी बाविस्कर, मीराबाई पाटील, कोळीलाबाई पाटील, आशा पाटील, अरुणाबाई राजपूत, वैजंताबाई पाटील यांच्यासह ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.
---------