उघड्यावरील दारुअड्डे, अवैध धंद्यावर दंडूका!

उघड्यावरील दारुअड्डे, अवैध धंद्यावर दंडूका!
Published on
मेन फिचर पान चार --- NSK26H22330 जळगाव : वाहतूक नियम माोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना पोलिस. --- NSK26H22333 उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर कारवाई करताना. -- NSK26H22332 महामार्ग व मुख्य चौकात वाहनांची तपासणी पथक. --- जळगावात पोलिसांचे छापासत्र; ६८१ जणांवर कारवाई अवैध धंदे, उघड्यावरील दारुअड्ड्यांना दणका; मोहिमेत ५ लाखांचा दंड वसूल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता.२३ : गुन्हेगारी नियंत्रणासह कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच सार्वजनिक ठिकाणांवर होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस दल सोमवारी सायंकाळी अचानक कारवाईसाठी रस्त्यावर उतरले. या विशेष मोहिमेंतर्गत उघड्यावर दारू पिणारे मद्यपी, टवाळखोर, अवैध वाहतूकदार, वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. जळगाव शहर व जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व विशेषत: शहराचे निकोप वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी जिल्‍हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या प्रयत्नातून ठराविक कालावधीनंतर अचानक कारवाईचे अस्त्र उगारण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर पोलिसांनी या मोहिमेत विशेष लक्ष केंद्रित केले होते. यात वाईन शॉपसमोर मद्यपान करणाऱ्या ५ जणांवर, तर मोकळ्या मैदानावर मद्यपान करणाऱ्या ४१ जणांवर कारवाई करण्यात आली. अंडापाव गाडीवर मद्यपान करणाऱ्या २ जणांविरोधातही कारवाई करण्यात आली. शाळा परिसरात कारवाई विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा आणि महाविद्यालय परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली. शाळा व महाविद्यालय परिसरात वेगाने वाहन चालविणे आणि कर्कश हॉर्न वाजविणाऱ्या १६ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. बेकायदा हॉटेल्स-लॉज तपासणी विनाओळखपत्र, नियमबाह्य पद्धतीने जोडप्यांना रुम उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल्स, लॉजेसची तपासणी करण्यात आली. प्रेमी युगलांमध्ये प्रसिद्ध हॉटेल्स, ढाबे अशा १५३ ठिकाणांवर पोलिसांनी धडक देत तपासणी, चौकशी करून गैरकृत्य आढळल्यावर कारवाई करण्यात आली. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आश्रय स्थाने असलेल्या १९ कॅफेंची तपासणी पोलिसांनी करवून घेतली. गुटखा विक्रेते शाळा व महाविद्यालय परिसरातील पानटपऱ्यांवर गुटखा (तंबाखूजन्य पदार्थ विक्री) प्रकरणी ७१ कारवाया करण्यात आल्या. तसेच बीपी ॲक्ट कलम ११० व ११२ अंतर्गत ४४ प्रकरणे नोंदविण्यात आली. वाहतूक पोलिसांची कारवाई वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आल्या. त्यात ट्रिपलसीटी दुचाकीस्वार, अवैध प्रवासी वाहतूकदार ७ वाहनांवर कारवाई केली. तर दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या २२ चालकांविरोधात ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई करण्यात आली. पाच लाखांचा दंड वसूल याशिवाय विविध वाहतूक नियमभंग आणि इतर गुन्ह्यांप्रकरणी ६८१ प्रकरणे दाखल करण्यात आली असून, एकूण ५ लाख १६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाने अशा विशेष मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा देत नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान टाळावे आणि वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन पोलिस अधीक्षकांतर्फे करण्यात आले आहे. ग्राफ विशेष मोहिमेत झालेली कारवाई - वाईन शॉपसमोर दारू पिणारे : ५ - खुल्या मैदानात दारू पिणारे : ४१ - हातगाड्यांवर दारु पिणारे : २ - शाळा-महाविद्यालयाजवळ जोरात गाडी, कर्कश हॉर्नवर कारवाई : १६ - हॉटेल, ढाबे, लॉजेस तपासणी : १५३ - कॅफे तपासणी : १९ - शाळा, महाविद्यालय परिसरात कारवाई : ७१ - बीपी ऍक्ट ११०/११२ कारवाई : ४४ -अवैध प्रवासी वाहतूक : ७ - ड्रंक अँड ड्राइव्ह : २२ - मोटार वाहन कायदा उल्लघंन : ६८१ केसेस - एकूण दंड वसूल : ५ लाख १६ हजार ४०० रुपये ----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com