जळगाव जिल्ह्यात १२ टक्के पाऊस
---
दमदार पावसाची प्रतीक्षाच
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २३ : शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मंगळवारी (ता. २३) मॉन्सूनने हजेरी लावली. मात्र, पेरणीलायक पावसाच्या दमदार सरी अजून बरसल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १४.९ मिलिमीटर व १२ टक्के पावसाची नोंद झाली. लवकरच पावसाचे दमदार आगमन होणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
सोमवारी (ता. २२) दुपारी व रात्री जिल्हाभरात बऱ्याच ठिकाणी तुरळक पाऊस झाला. मंगळवारी सकाळी जळगाव शहरात पाऊस झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळला. मात्र, उकाड्यात वाढ झाली.
जूनमध्ये सरासरी १२३.७ मिलिमीटर पाऊस अपेक्षित आहे. ७ ते २० जूनदरम्यान कोरड्या आणि उष्ण हवामानामुळे पावसाची नोंद झालेली नाही. रविवार (ता. २१)नंतर पावसाने तुरळक हजेरी लावली. गेल्या २४ तासांत चाळीसगावला २३ मिलिमीटर पाऊस झाला.
आतापर्यंत झालेला पाऊस
तालुका--- पाऊस (मिलिमीटरमध्ये)
जळगाव--- १०.६
भुसावळ--- ७.८
यावल--- २.०
रावेर--- १९.७
मुक्ताईनगर--- ३.१
अमळनेर--- १०.४
चोपडा--- २.४
एरंडोल--- १२.७
पारोळा--- २५.८
चाळीसगाव--- ४१.७
जामनेर--- ४.०
पाचोरा--- १८.७
भडगाव--- १२.९
धरणगाव--- १.६
बोदवड--- ०.०
एकूण--- १४.९