धुळे : टुडे पान ३ साठी..
--
रावल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे वर्चस्व
--
तंत्रनिकेतनची यशाची परंपरा कायम; विविध शाखांतील विद्यार्थी ठरले अव्वल
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २३ : दोंडाईचा येथील श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या परीक्षेत यश संपादन केले. नुकत्याच जाहीर झालेल्या या निकालात संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध शाखांमध्ये उत्कृष्ट गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
-
निकालात इलेक्ट्रिकल शाखेत प्रथम वर्षात शुभांगी बडगुजर (७६.५९ टक्के), द्वितीय वर्षात हृतिक पाटील (७२.५९) तर तृतीय वर्षात दीप देवरे (७७.७२) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. मेकॅनिकल शाखेत प्रथम वर्षात अनिकेत पाटील (७०.३३), द्वितीय वर्षात ज्ञानेश्वर धनगर (६९.५६) आणि तृतीय वर्षात निखिल पाटील (७५.१३) यांनी अव्वल स्थान पटकावले. कॉम्प्युटर शाखेत प्रथम वर्षात निपुण नेरकर (७५.४१) तर द्वितीय वर्षात मधुर मगरे (८२.४७) यांनी विशेष गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. सिव्हिल शाखेत प्रथम वर्षात मयूर जाधव (७२.६७) आणि द्वितीय वर्षात गौरव कोलपकर (६९.४४) यांनी प्रथम येत यश संपादन केले.
संस्थेचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनात महाविद्यालयाने यशाची परंपरा निर्माण केली आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव सी. एन. राजपूत, सहसचिव आर. टी. गिरासे, सहसचिव डी. एन. जाधव, सामान्य प्रशासन सचिव ललितसिंह गिरासे, प्राचार्य डॉ. डी. एम. पटेल, प्राचार्य एम. डी. पाटील, उपप्राचार्य बी. डी. गिरासे तसेच उपप्राचार्य के. डी. सोनार यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.