महेश नवमी

महेश नवमी
Published on
NSK26H22362 जळगाव : महेश नवमीनिमित्त शहरातून काढण्यात आलेली शोभायात्रा. --- NSK26H22364 : भगवान महादेवाची भव्य प्रतिमा --- ‘जय महेश’चा जयघोषात भव्‍य शोभायात्रा (उपशीर्षक) माहेश्‍वरी समाजातर्फे महेश नवमी उत्‍सव; सजिव आरासने वेधले लक्ष सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २३ : माहेश्वरी समाज उत्पत्ती दिनानिमित्त महेश नवमी उत्सव आज (ता. २३) उत्‍साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातून भव्‍य शोभायात्रा काढण्यात आली. ‘जय महेश’च्या जयघोषात निघालेल्या शोभायात्रेने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले. श्री माहेश्वरी समाज उत्पत्ती दिनानिमित्त माहेश्‍वरी समाजाच्‍यावतीने दरवर्षी महेश नवमी उत्‍सव साजरा केला जात असतो. त्‍यानुसार यंदा देखील शहरात श्री माहेश्वरी युवा संगठन, जळगाव शहर माहेश्वरी समाज व महेश नवमी उत्सव समितीतर्फे श्री महेश नवमी उत्सव साजरा झाला. यानिमित्त माहेश्वरी समाजातार्फे श्री महेश नवमीनिमित्ताने दिवसभरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यानंतर सायंकाळी साडेपाचच्‍या सुमारास शहरातून भव्‍य शोभायात्रा काढण्यात आली. सजीव आरासने वेधले लक्ष सायंकाळी साडेपाचच्‍या सुमारास शहरातून भव्‍य शोभायात्रा काढण्यात आली. यात भव्य शिवलिंग लक्ष वेधून घेत होते. सोबत वाहनावर भगवान महादेवाची भव्य प्रतिमा तसेच भगवान शिव व पार्वती यांच्या वेशभूषेत लहान बालके सहभागी झाले होते. यावेळी ‘जय महेश’चा जयघोष केला जात होता. शोभायात्रेत सहभागी महिला- पुरुषांसह लहान मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शोभायात्रेनंतर महाप्रसाद वाटप सदरची शोभायात्रा माहेश्वरी बोर्डिंग येथून सुरू होऊन कोर्ट चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, घाणेकर चौक, चौबे शाळा, सुभाष चौक, दाणा बाजार, नवी पेठ, शिवतीर्थ चौक मार्गे पुन्हा माहेश्वरी बोर्डिंग येथे शोभायात्रेचा समारोप झाला. याठिकाणी महेश वंदना सादर केली. यानंतर सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com