टुडे ३ साठी..अवतीभवती

टुडे ३ साठी..अवतीभवती
Published on
धुळे : टुडे पान ३ साठी..अवतीभवती -- फोटो क्रमांक : 22241 - वेदांग सोनार - साक्रीच्या वेदांगची ऑस्ट्रेलियात भरारी - साक्री : येथील शिवाजीनगरचा रहिवासी वेदांग अविनाश सोनार याची ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील ‘युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न क्वीन्सलँड’मध्ये तीन वर्षांच्या पीएचडी संशोधनासाठी प्रतिष्ठेच्या फेलोशिपसह निवड झाली आहे. ऊर्जा क्षेत्रातील संशोधनासाठी त्याला ही फेलोशिप मिळाली आहे. वेदांगचे काका डॉ. प्रशांत सोनार २६ वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत जर्मनीला गेले होते. जगातील सर्वोत्तम पाच टक्के संशोधकांमध्ये त्यांची गणना होते. त्यांच्या पत्नी योगिता सोनार यांनीही शिक्षणातील २० वर्षांच्या खंडानंतर ‘क्यूयूटी’मधून एम.फिल. पूर्ण केले. कुटुंबातील याच काकांचा आदर्श ठेवून वेदांगने संशोधनाचे ध्येय बाळगले होते. तो अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात सोडियम व पोटॅशियम आयन बॅटरीच्या ‘एनर्जी स्टोरेज’वर संशोधन करणार असून त्याला प्रा. अशोक नानजुनंदन व प्रा. दीपक दुबल यांचे मार्गदर्शन लाभले. वेदांगचे शिक्षण साक्री, नाशिकचे केटीएचएम कॉलेज, पुण्याचे एस. पी. कॉलेज व व्हीआयटी (वेल्लोर, तमिळनाडू) येथे झाले. तो निवृत्त सेवक (स्व.) मुरलीधर गोविंद सोनार व निवृत्त प्राथमिक शिक्षिका कमलबाई सोनार यांचा नातू तर न्यू इंग्लिश स्कूलचे उपमुख्याध्यापक अविनाश सोनार व जिल्हा परिषद शाळा किरवाडे येथील शिक्षिका माधुरी सोनार यांचा सुपुत्र आहे. वेदांग २५ जूनला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. -- जयहिंद शाळेत योग दिनी प्रात्यक्षिके धुळे : येथील जयहिंद मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी योग दिनी विविध प्रात्यक्षिके घेण्यात आली. योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि बुद्धीचा समतोल साधणारे प्रभावी माध्यम आहे. नियमित योगाभ्यासामुळे विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते आणि तणावमुक्त जीवन जगता येते, असे प्रतिपादन योग विद्या धामच्या योगाशिक्षिका मीनाक्षी पटेल यांनी यावेळी केले. या प्रसंगी योगाशिक्षिका मीनाक्षी भामरे यांचीही उपस्थिती होती. दोन्ही योगाशिक्षिकांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके करून दाखवली आणि उपस्थित शिक्षक-शिक्षिकांनाही मार्गदर्शन केले. या उपक्रमाबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. मोहन मोरे यांनी समाधान व्यक्त केले. मुख्याध्यापिका शालिनी वाघ, रीणा पाटील, जगतसिंग राऊत, नमिता पाटील, रूपाली सूर्यवंशी, संगीता देसले आदी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com