अवतीभवती- धुळे टुडे ३ साठी...
---
आदर्श पॉलिटेक्निकचा
निकाल ९२ टक्के
धुळे ः आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धुळे संचलित आदर्श पॉलिटेक्निकचा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ परीक्षेचा निकाल ९२ टक्के लागला. विभागनिहाय प्रथम तीन विद्यार्थी असे ः सिव्हील (प्रथम वर्ष)- प्रथम- एतेश्याम अन्सारी (७५), द्वितीय- संघमित्रा महाले (७१.६७), तृतीय- शाहीद पिंजारी (६९.२२). द्वितीय वर्ष ः प्रथम- मोनिका पाडवी (७७), द्वितीय- मानस करनकाळ (७६.११), तृतीय- गोवर्धन वळवी (७५). तृतीय वर्ष ः प्रथम- रेखा गोयकर (७५.८३), द्वितीय- जमन अन्सारी (७२.७२), तृतीय- हरीश शेख (७१.३९). इलेक्ट्रिकल (प्रथम वर्ष) ः प्रथम- देवश्री महाले (७८.७१), द्वितीय- तन्मय जाधव (७५.००), निवृत्ती खैरनार (७५.००), तृतीय- पुष्कर पवार (७१.७७). द्वितीय वर्ष ः प्रथम- हर्षदा पाटील (७०.२९), द्वितीय- नैतिक कोळी (६८.९४), तृतीय- दुष्यंत शेवाळे (६८.०३). तृतीय वर्ष ः प्रथम- विशाल गोपाळ (७६.७८), द्वितीय- दीप मोरे (७६.५६), तृतीय- मृणाल बेडसे (७५.६७). मेकॅनिकल (प्रथम वर्ष) ः प्रथम- मोहम्मद शेख (६७.७८), द्वितीय- प्रतिक्षा चौधरी (६७.५६), तृतीय- गौरव खैरनार (६६.७८). द्वितीय वर्ष ः प्रथम- कुणाल बागले (७६.११), द्वितीय- नीलेश मासुळे (७५.८९), तृतीय- हिमांशू पटेल (७५.००). तृतीय वर्ष ः प्रथम- आकाश वाघ (७८.८९), द्वितीय- मोनीस वेंदे (७७.२२), तृतीय- विशाल सोनवणे (७३.७८).
---
महापालिकेची आज
सर्वसाधारण महासभा
धुळे ः महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (ता.२३) सकाळी अकराला महापालिकेतील स्व. अटल बिहारी वाजपेयी सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या अजेंड्यावर काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा व निर्णय होतील. फागणे येथे मनपाच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे जलवाहिनी जोडणी, मानधनावरील २३ लिपिक/टंकलेखक, वीजतंत्री यांचे रिक्त पदांवर समावेशन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविणे, मनपा शाळा-२८ समोरील मोकळ्या जागेत छत्रपती शिवाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारणे, खासगी ट्रॅव्हल्सला स्वच्छता व वाणिज्य वापर शुल्क आकारणे, महापालिकेच्या जागांवर पे अँड पार्क सुविधा सुरु करणे यासह इतर विषयांचा समावेश आहे.
---