NSK26H22356
जळगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा बैठकीत बोलताना प्रा. डी. एस. कट्यारे.
--------
अंधश्रद्ध व्यक्तीला करुणा,
आपुलकीची आवश्यकता
--------
प्रा. कट्यारे : ‘अंनिस’च्या बैठकीत कार्यकर्त्यांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २४ : परिस्थितीशी हतबल, अगतिक झालेला व्यक्ती भरकटून बुवा बाबांच्या दरबारी बसतो व त्याचे आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण होते. त्यामुळे अंधश्रद्धेत फसलेल्या व्यक्तीला क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची अधिक गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य पदाधिकारी प्रा. डी. एस. कट्यारे यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव जिल्ह्याची बैठक नुकतीच झाली, त्याप्रसंगी ते बोलत होते. आगामी काळात जिल्ह्यातील विविध शाळा व महाविद्यालयांत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी ''वैज्ञानिक दृष्टिकोनयुक्त शाळा'' व ''लर्निंग फेलोशिप''अंतर्गत विशेष कार्यक्रम राबविण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला. यावेळी निरीक्षक कट्यारे यांनी अहिल्यानगर येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीचा वृत्तांत मांडला. मंचावर राज्य पदाधिकारी विश्वजीत चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे, जिल्हा प्रधान सचिव रवींद्र चौधरी, सुनील वाघमोडे व शहराध्यक्ष प्रा. डॉ. युवराज वाणी उपस्थित होते.
-------
उत्कृष्ट शाखा पुरस्कार
जामनेर व अमळनेर शाखा तसेच लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार जिल्हा उपाध्यक्ष नाना लामखेडे, जळगाव शहर कार्याध्यक्ष मीनाक्षी चौधरी, जामनेरचे तीर्थराज सुरवाडे, अमळनेरचे डॉ. दिनेश पाटील यांना मिळाला. या बैठकीसाठी शहर शाखा कार्याध्यक्ष मीनाक्षी चौधरी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.