--
धुळे : टुडे पान २ साठी..
--
फोटो क्रमांक : 22365
साक्री : क्रीडा संकुल मैदानावर क्रिकेट टॅलेंट सर्च या उपक्रमात सहभागी खेळाडूंसह भूपेश पटेल. शेजारी डॉ. तुळशीराम गावित, मनोहर पाटील, उषा पवार, संजय जगताप, सचिन दहिते, पंकज मराठे, डॉ. हेमंत बच्छाव आदी.
--
साक्रीत क्रिकेट टॅलेंट सर्चमध्ये १४८ खेळाडूंचा सहभाग
--
ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी; स्पर्धात्मक क्रिकेटसाठी हक्काचे व्यासपीठ
--
सकाळ वृत्तसेवा
साक्री, ता. २३ : धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि साक्री तालुका लेदरबॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे तालुकास्तरीय ''क्रिकेट टॅलेंट सर्च'' हा विशेष उपक्रम झाला. तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर पार पडलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमात तालुक्यातील १४८ हून अधिक खेळाडू सहभागी झाले.
-
जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे ज्येष्ठ सल्लागार राजवर्धन कदमबांडे अध्यक्षस्थानी होते. शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. तुळशीराम गावित, धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते, जिल्हा क्रीडाधिकारी मनोहर पाटील, साक्रीच्या नगराध्यक्ष उषा पवार, भाडणेचे सरपंच अजय सोनवणे, नगरसेवक राहुल भोसले, दीपक वाघ, उद्योजक लक्ष्मीकांत शाह, पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे, शेतकी संघाचे उपसभापती प्रदीप नांद्रे, दीपक कोठावदे, मुन्ना देवरे, प्रवीण देवरे यांच्यासह पदाधिकारी, क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. ग्रामीण भागातील होतकरू व गुणवान क्रिकेटपटूंना आपले कौशल्य दाखवण्यासाठी आणि त्यांना पुढील स्पर्धात्मक क्रिकेटसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या टॅलेंट सर्चमध्ये साक्री तालुक्यातील विविध ग्रामीण भागातून १४० पुरुष आणि ८ महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला. सर्व सहभागी खेळाडूंनी गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण या क्रीडा प्रकारांमध्ये कौशल्य प्रदर्शित केले. यातून प्रतिभावान खेळाडूंची निवड करण्यासाठी धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक फिरोज शेख आणि गीता जैन यांनी काम पाहिले. असोसिएशनचे जिल्हा संचालक संजय जगताप, संचालक सचिन दहिते, साक्री तालुका लेदरबॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज मराठे, उपाध्यक्ष डॉ. हेमंत बच्छाव, कार्याध्यक्ष धनंजय सोनवणे, कोषाध्यक्ष प्रकाश पटेल, कार्यकारिणी सदस्य महेंद्र मराठे, महेंद्र देसले, संदीप पाटील, डॉ. चंद्रकांत शिंदे, राकेश वेंडाईत, धनंजय व्ही. सोनवणे, हिम्मत साबळे, क्रीडा प्रशिक्षक अनिल पाटील आणि लिपिक यशपाल देसले यांनी संयोजन केले.