न्यायालयात योग दिन

न्यायालयात योग दिन
Published on
धुळे : टुडे पान २ साठी..अँकर -- फोटो क्रमांक : 22372 धुळे : जिल्हा न्यायालय परिसरात योग दिनी योगासने करताना न्यायाधीश समृद्धी भीष्म. शेजारी राहुल भामरे, विशाल साळवे आदी. -- योग ही आरोग्याचा समतोल साधणारी जीवनशैली -- न्या. भीष्म : धुळे जिल्हा न्यायालयात जागतिक योग दिन साजरा -- सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ : योग हा केवळ व्यायामाचा प्रकार नसून शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा समतोल साधणारी एक प्रगल्भ जीवनशैली आहे. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा नियमित समावेश करून निरोगी व सुखी जीवनाचा मार्ग स्वीकारावा, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती समृद्धी भीष्म यांनी केले. - धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय आणि धुळे जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (ता. २१) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात जागतिक योग दिन कार्यक्रम झाला. या विशेष कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश अस्मर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी, जिल्हा न्यायाधीश जी. बी. गुरव, न्यायाधीश पी. व्ही. बुलबुले, धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. राहुल भामरे, उपाध्यक्ष विशाल साळवे, विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक मुकुंद भट, प्रभारी प्रबंधक सुनील जिरे, अधीक्षक प्रवीण बागुल, मनोज अहिरराव, अलकेश पातुरकर यांच्यासह जिल्ह्यातील वकील, न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. न्यायमूर्ती भीष्म म्हणाल्या, की आजच्या कमालीच्या धावपळीच्या युगात मन आणि शरीराला अचूक स्थैर्य देण्यासाठी योगाची आवश्यकता वाढली आहे. न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामकाज प्रामुख्याने बैठक स्वरूपाचे असते. त्यामुळे शरीराची लवचिकता, ताकद आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी नियमित योगाभ्यास गरजेचा आहे. दररोज अवघा पाच मिनिटे वेळ काढून योग, प्राणायाम आणि ध्यान केल्यास जीवनात मोठे सकारात्मक बदल घडून येतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीसोबतच उत्तम मानसिक शांतता लाभते, असे सांगितले. ताणतणाव कमी करून जीवन अधिक संतुलित राखण्यासाठी योग हे सर्वात प्रभावी साधन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी योगशिक्षक डॉ. राजेंद्र निकुंभ यांच्या मार्गदर्शनात उपस्थित सर्वांनी ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भुजंगासन, वज्रासन, पवनमुक्तासन, शलभासन, मकरासन आणि शवासन या योगासनांचा सराव केला. तसेच अनुलोम-विलोम, कपालभाती, भ्रामरी, उज्जायी आणि दीर्घ श्वसन अशा विविध प्राणायामांचा सामूहिक सराव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com