टुडे २ साठी..अवतीभवती

टुडे २ साठी..अवतीभवती
Published on
धुळे : टुडे पान २ साठी..अवतीभवती -- ‘उशिरा आलेल्या नीट परीक्षार्थींना न्याय द्या’ धुळे : नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या सावटानंतर पुन्हा घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान अवघ्या काही मिनिटांच्या विलंबाने पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. या असंवेदनशील प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली असून त्यांचे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून, सर्वसामान्य कुटुंबातून मोठ्या अपेक्षेने आणि अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर या परीक्षेला सामोरे जातात. वाहतूक कोंडी किंवा अनपेक्षित अडचणींमुळे काही मिनिटांचा विलंब होऊ शकतो. अशा परिस्थितीत प्रशासनाने केवळ नियमांवर बोट न ठेवता संवेदनशील भूमिका घेणे गरजेचे आहे. पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, मात्र त्याची शिक्षा प्रामाणिक विद्यार्थ्यांना मिळता कामा नये. या वंचित विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, अशी मागणी धुळे जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष आलोक रघुवंशी यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली. -- खलाणेत शाळेत ‘योगसंगम’ साजरा धुळे : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त खलाणे (ता. शिंदखेडा) येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा येथे ‘योगसंगम’ कार्यक्रम झाला. शाळेतील पहिली ते चौथीच्या सुमारे १८० विद्यार्थ्यांनी आणि सर्व शिक्षकांनी या योग व प्राणायाम प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग घेतला. योगशिक्षक राकेश पाटील यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, ताडासन, वज्रासन, भुजंगासन व शवासनासह विविध योगासने आणि कपालभाती, अनुलोम-विलोम प्राणायामांचे सादरीकरण केले. शिक्षक पाटील यांनी शीर्षासनात भद्रासन व वज्रासन करून दाखवले, जे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. शिक्षक शरद पाटील यांनी नियमित योगामुळे शरीर निरोगी राहून अभ्यासात एकाग्रता वाढते, असे सांगितले. मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव, शिक्षक शरद पाटील, राकेश पाटील, प्रवीणकुमार सोनवणे, वैशाली शिंदे, मनीषा बोरसे, कविता पवार, प्रिया सांगळे, बाळू गिरासे, रोहन गिरासे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com