विद्यार्थ्यांना शेवटची संधी

विद्यार्थ्यांना शेवटची संधी
Published on
धुळे ः टुडे १ साठी, ॲंकरच्या शेजारी -- स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेस ३ जुलैपर्यंत मुदत - विद्यार्थ्यांना शेवटची संधी; बँक तपशीलाचा प्रश्‍न - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २३ ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी आहेत. त्यांना त्रुटींची पूर्तता करण्यासाठी ३ जुलैपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी दिली. - योजनेंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करणारे विद्यार्थी आणि केवळ त्यांचेच प्रलंबित अर्ज आणि ऑलरेडी अप्लाईड फॉर स्वाधार, असे अर्ज त्रुटी पूर्तता व तपासणीसाठी ऑनलाईन उपलब्ध केले आहेत. शिवाय पात्र विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये बँक तपशील अद्ययावत करण्यासाठी नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वाधार योजनेच्या लॉगिनवर ३ जुलै २०२६ पूर्वी सर्व त्रुटींची पूर्तता करून घ्यावी. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे समाज कल्याण कार्यालयाचे प्रभारी विशेष अधिकारी योगेश चौधरी आणि श्री. नांदगावकर यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com