संक्षिप्त

संक्षिप्त
Published on
संक्षिप्त केळी रोपे जिल्ह्यात मुबलक जळगाव : केळीचे दर सध्या स्थिर आहेत. यामुळे मे, जून महिन्यात केळी लागवड कमी राहीली. केळी रोपांची मागणी कमी आहे. रोपे मुबलक आहेत. खानदेशात यावल, चोपडा, रावेर, जळगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात कमाल शेतकरी केळीच्या उतिसंर्धित रोपांची लागवड करतात. पण यंदा महागाई व उष्णता यामुळे केळी रोपांची लागवड घटली आहे. या रोपांचे दर स्थिर आहेत. दर्जेदार रोपांचा पुरवठा सुरू आहे. या रोपांचे दर प्रतिरोप १८ ते २१ रुपये, असे आहेत. खानदेशात मे, जून महिन्यातील केळीला मृग बाग किंवा मृग बहर केळी लागवड म्हणतात. ही लागवड खानदेशात अधिक असते. यंदा जुलैतही ही लागवड सुरू राहणार आहे. यामुळे पुढे रोपांची मागणी राहू शकते. जळगावमधील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर भागात लागवड रखडत सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com