जळगाव शहर टुडे पान चारसाठी दोन कॉलम घ्यावी
----------------------------
NSK26H22384
जळगाव : शानभाग विद्यालयात विद्यार्थी व पालकांचा गौरव करताना शोभा पाटील.
---------------------------------
शानभाग विद्यालयात गुणवंतांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : विवेकानंद प्रतिष्ठान संचलित सावखेडा येथील ब. गो. शानभाग विद्यालयात दहावी परीक्षेत प्रथम पाच, निवासी विद्यालयातील प्रथम, विषयनिहाय प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव सोहळा नुकताच झाला. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे सचिव व शालेय समितीचे अध्यक्ष विनोद पाटील होते.
प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा सध्या अमेरिकेतील एका कंपनी अभियंता असलेले अमेय श्रीकांत देवगावकर उपस्थित होते. मंचावर प्रतिष्ठानचे सहसचिव दिलीप महाजन, माजी अध्यक्षा शोभा पाटील, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक पाटील यांनी केले. अमेय देवगावकर यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून नंदिनी देसले व अदिती ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. पालक प्रतिनिधी सतीश देसले व राहुल ठाकरे यांच्यासह शोभा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रियंका कोळी व सचिन पाटील यांनी केले. उमेश इंगळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मनीषा भालेराव यांनी आभार मानले.