मेन फिचर शहर - जिल्हा कॉमन घ्यावे)
(रेशन वितरणाचे संग्रहित छायाचित्र वापरावे)
---
‘ई-पॉज’च्या तांत्रिक कारणामुळे रेशन दुकाने बंद
जळगावसह शहरासह जिल्ह्यात धान्य वितरण रखडले; दुकानावर लाभार्थ्यांचे हेलपाटे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २५ : जिल्ह्यात एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे मोफत धान्य एकत्र वितरित करण्याच्या शासनाच्या निर्णयाला यंत्रणेच्या संथ कारभारामुळे ब्रेक लागला आहे १५ जूनची अंतिम मुदत उलटूनही जळगाव शहरासह जिल्ह्यात अद्याप एप्रिलचे ७ टक्के, तर मे महिन्याचे ५ टक्के धान्य वितरण बाकी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जून महिना संपत आला तरी जिल्ह्यातील तब्बल ५८ टक्के शिधापत्रिकाधारक या मोफत धान्य लाभापासून वंचित असल्याचे समोर आले आहे.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार तिन्ही महिन्यांचे धान्य एकाच वेळी वितरणाचे नियोजनानुसार १५ जूनपर्यंत करण्याचे निर्देश होते. असे असले तरी सर्व्हर डाऊन तसेच माथाडी कामगारांचा संप यामुळे धान्य पुरवठ्यामध्ये खोळंबा झाला. या गोंधळामुळे पुरवठा विभागाने ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरणासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यात अनेकदा रेशन दुकानांवर नेटवर्क नसल्यामुळे बायोमेट्रिक पडताळणी होत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना रेशन न मिळताच दुकानावर हेलपाटे मारत माघारी फिरावे लागत आहे.
धान्य वितरण
जळगाव जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ८८१ अंत्योदय शिधापत्रिकाधारक, ५ लाख ५५ हजार ४२४ प्राधान्य कुटुंब प्राधान्य असे सरासरी ६ लाख ७० हजार ६५ शिधापत्रिका धारक आहेत. यात जून महिन्यासाठी गहू ७४ हजार ४६९.३, तांदूळ ६३ हजार ९८.५१, ज्वारी ५ हजार २१९.३२, मका १६ हजार ४७१.३८ मे.टन असा धान्य पुरवठा तालुकास्तरावर करण्यात आला आहे.
चौकट
निम्मेपेक्षा अधिक लाभार्थी अजूनही वंचित
जिल्ह्यात आतापर्यंत गहू ३२ हजार १२४.३, तांदूळ २७ हजार ९७५.४७४१, ज्वारी २ हजार ७१.८९ आणि मका ७ हजार ७८४.७४ मे.टन असे सरासरी ४१.६२ टक्के वितरण स्वस्त धान्य दुकानातून झालेले आहे. धान्य वितरणात मुक्ताईनगर, रावेर आघाडीवर असून सरासरी ७५ टक्के वितरण स्थिती आहे. मात्र जामनेरसह अन्य तालुक्यात ७० टक्क्यांपेक्षाही कमी वितरण झाले आहे. सर्वात कमी १०.५५ टक्के वितरण एरंडोल तालुक्यात आहे. यात भडगाव १३.९१, पारोळा २३.२१, बोदवड २६.९१, तर चोपडा ५०.२३ टक्के अशी कमी अधिक प्रमाणात वितरण स्थिती आहे.
-----------
कोट
शासनाकडून एप्रिल, मे व जून महिन्याचे धान्य एप्रिल २०२६ मध्ये वितरणासाठी सूचित करण्यात आले होते. तथापि या कालावधीत हमाल मापडी यांचा संप, वेळेत उचल-वाटपअभावी धान्य वितरणाचे प्रमाण कमी झाले. लाभार्थ्यांना धान्य वाटप दुकानात सुरुवातीला धान्य उपलब्ध झाल्यापासून महिना अखेरपर्यंत दिले जाते. लाभार्थी धान्य लाभापासून वंचित राहू नये म्हणून १२ जूनला शासनाला मशिनद्वारे धान्य वाटपाच्या मुदतवाढीची विनंती करण्यात आली आहे.
- महेश चौधरी, जिल्हा पुरवठा अधिकारी
---