संक्षिप्‍तसाठी

संक्षिप्‍तसाठी
Published on
संक्षिप्‍तसाठी NSK26H22301 भोकर : गुणवंत विद्यार्थ्यांसह मान्‍यवर. ----- गुणवंत विद्यार्थ्यांचा भोकर गावात गौरव जळगाव : तालुक्यातील भोकर येथे शिवशक्ती युवा फाउंडेशनतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताचझाला. यात पहिली ते १२वीची परीक्षा उत्‍तीर्ण झालेल्‍या गावातील २४ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्‍कार करण्यात आला. शिवशक्ती युवा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा मोनालिका पवार यांच्या वतीने या कार्यक्रम घेण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्‍या जयश्री पाटील, ज्येष्ठे नेते प्रभाकर पवार, राष्‍ट्रवादीच्‍या विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे, सोनाली देऊळकर, जिल्हाध्यक्षा भाग्यश्री ठाकरे, सरपंच प्रमिला सोनवणे, सुधाकर पवार, माजी सरपंच हरीश पवार, प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्‍यासह श्रीराम पाटील, सुरेश पवार, सुभाष पवार, शिवानंद पवार, प्रभाकर सोनवणे, अशोक पाटील आदी उपस्थित होते. ------ नामांकीत कंपनीत विद्यार्थ्यांना नोकरी जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसच्या ५० पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये देशातील नामांकीत केमिकल व मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांकडून नोकरीची संधी मिळाली. प्रशाळेने उत्कृष्ट इंडस्ट्री भरतीची परंपरा कायम ठेवली. यशस्वी विद्यार्थ्यांचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी अभिनंदन केले. परिसर मुलाखतीत इंडस्ट्रीमार्फत प्रमुख तांत्रिक पदांसाठी भरती करण्यात आली. त्यात संशीचन व विकास रसायनशास्‍त्रज्ञ, गुणवत्ता नियंत्रण अधिकारी, उत्पादन व पोस्ट रसायनशास्त्रज्ञ म्हणून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रशाळेमार्फत परीक्षा झाल्यानंतर एक महिन्याच्या आत ५० विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com