NSK26H22386
भुसावळ : भोरगाव लेवा पंचायतेतर्फे आयोजित स्वररत्न सोहळ्यात सहभागी मान्यवर.
---------------------
भोरगाव लेवा पंचायततर्फे
स्वररत्नचे बक्षीस वितरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : भोरगाव लेवा पंचायतच्या भुसावळ शाखेतर्फे आयोजित ‘स्वररत्न’ संगीत स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा भुसावळला नुकताच झाला. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, कुटुंबनायक ललित पाटील, भुसावळ विभाग प्रमुख सुहास चौधरी उपस्थित होते.
सुरुवात अश्विनी भंगाळे यांच्या गणेशस्तवनाने झाली. स्पर्धेत ६५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. पैकी ऑडिशनद्वारे २५ ते ३० स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. भुसावळसह जळगाव, सावदा, फैजपूर, कळमोदा, उल्हासनगर, ठाणे, अमरावती, नाशिक आदी भागांतील गायकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. सोलो गायन स्पर्धेत उल्हासनगरच्या देवश्री राजेश भंगाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. कळमोदा येथील चेतन मयूर जावळे यांनी द्वितीय, वरणगावच्या मानस गोपाळ पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे ५,००१ रुपये, ३,००१ व २,००१ रुपये रोख रक्कम, शिल्ड व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. युगल गीत स्पर्धेत उल्हासनगरचे राजेश भालचंद्र भंगाळे व देवश्री राजेश भंगाळे या जोडीने प्रथम क्रमांक मिळविला. ऐश्वर्या योगेश पाटील व योगेश प्रशांत राणे यांनी द्वितीय, तर चेतन ढाके व वर्षा पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या विजेत्या जोड्यांनाही रोख पारितोषिके, शिल्ड व प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण जळगावचे एन. ओ. चौधरी, भुसावळच्या चैताली पाचपांडे व फैजपूरचे शिवम चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन वर्षा लोखंडे व सुभाषचंद्र भंगाळे यांनी केले.
डॉ. विकास कोळंबे, डॉ. वर्षा कोळंबे, प्रमोद धनगर, गोविंदा ढाके, निळू भारंबे, सुधीर पाटील, प्रभा पाटील, जगदीश फिरके, दिनेश पाटील, अरविंद झोपे, मनोज जावळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे महादेव हरीमकर, भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेच्या संचालक आरती चौधरी, हरीष फालक, परिक्षित बऱ्हाटे, शरद फेगडे, किरण चौधरी, मंगला पाटील, संजय पाटील, अजय पाटील, अनिल वारके, धनंजय पाटील आदी उपस्थित होते.