अवतीभवती

अवतीभवती
Published on
अवतीभवती -- राज्य नाट्य स्पर्धेचे ३०ला पारितोषिक वितरण नाशिक : सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६४व्या महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवाचा विभागीय पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी (ता. ३०) जूनला परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सायंकाळी साडेपाचला होणार आहे. ६४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी व २२व्या राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीतील पारितोषिक विजेत्या कलाकारांचा सन्मान या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केला जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन स्पर्धा समन्वयक राजेश जाधव यांनी केले आहे. ---------- ‘नाट्यरसिक’तर्फे आज दर्जेदार नाट्यप्रयोग नाशिक : नाट्यरसिक ग्रुपच्या ‘नाट्यपर्वणी’ उपक्रमांतर्गत नाशिककर रसिकांसाठी गुरुवारी (ता. २५) महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी चारला दोन दर्जेदार हिंदी नाट्यप्रयोगांचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे. सुरवातीला व्यंगकार हरिशंकर परसाई लिखित गाजलेल्या ‘हम बिहार में चुनाव लड रहे हैं’ या एकपात्री नाटकाचा १०४४ वा प्रयोग नाशिकमध्ये सादर होणार आहे. या नाटकाचे सादरीकरण ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनेते व दिग्दर्शक विजय कुमार करतील. त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक उदय प्रकाश यांच्या गाजलेल्या ‘तिरिछ’ या कथेचे रंगमंचीय सादरीकरण रंगकर्मी ज्ञानेंद्र सिंह ‘अंशु’ सादर करतील. यावेळी हिंदी साहित्य आणि रंगभूमीचा अनोखा संगम रसिकांना अनुभवता येणार आहे. --------- विश्व मराठी परिवार दिनानिमित्त विविध स्पर्धा नाशिक : मॉडर्न एज्युकेशन सोसायटी संचलित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत संस्थेचे संस्थापक सदस्य प्रा. यशवंत कुलकर्णी यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. ‘विश्व मराठी परिवार दिन’ म्हणून साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमात निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, मराठी भाषेचे महत्त्व, मराठी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी अनेक संत व कवी यांचे पात्र साकारण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मराठी भाषा व संस्कृतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका साक्षी ठकुरेल, रेणू जोशी तसेच शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ------- घारपुरे घाटावर रविवारी हेरिटेज वॉक नाशिक : नाशिक दर्शन व नाशिक इतिहास संशोधन मंडळातर्फे रविवारी (ता. २८) रामवाडी पुलाजवळील घारपुरे घाट, सिद्धेश्वर मंदिरात नाशिक हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी घारपुरे घाट, सिद्धेश्वर मंदिर व बायजाबाईची गढी या परिसराविषयी माहिती दिली जाणार आहे. हा वॉक सकाळी साडेआठला सुरू होणार आहे. हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी सकाळी सव्वाआठला घारपुरे (हनुमान व तांबट) घाटाजवळ एकत्र जमण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com